Forbes 2024 : ना आलिया ना अनुष्का; बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय. 

Jun 19, 2024, 14:07 PM IST
1/10

यंदाही भारतात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहेत, याची यादी फोर्ब्सने प्रसिद्ध केलीय. या यादीत खासदार कंगनापासून अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नाव आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहे ते. 

2/10

या यादीनुसार शेवटच्या क्रमांकावर अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन आहे. अनुष्का एका चित्रपटासाठी 8 ते 12 कोटी घेते तर ऐश्वर्या ही 10 कोटी मानधन घेते. 

3/10

नुकताच प्रदर्शित झालेला 'दो और दो प्यार' मधील विद्या बालन 8 ते 14 कोटी इतकं मानधन घेते. 

4/10

विद्या बालनपेक्षा श्रद्धा कपूर ही 7 ते 15 कोटी रुपये एका चित्रपटासाठी मानधन घेते. 

5/10

तर करिना कपूर 8 ते 18 कोटी रुपये एका चित्रपटासाठी आकारते. 

6/10

या यादीत राहाची आई आलिया भट्ट पाचव्या क्रमांकावर असून ती एका चित्रपटासाठी 10 ते 20 कोटी रुपये घेते. 

7/10

चौथ्या क्रमांकावर कतरिना कैफ ही एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये मानधन आकारते. 

8/10

तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रियांका चोप्रा जी एका चित्रपटासाठी साधारण 15 ते 25 कोटी रुपये घेते. 

9/10

दुसऱ्या क्रमांकावर खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत असून ती एका चित्रपटासाठी 15 ते 27 कोटी रुपये आकारते. कंगना लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. 

10/10

तर या सगळ्यांना मागे टाकलंय आणि 'हायेस्ट पेड' हे टॅग घेतलंय दीपिका पादुकोण हिने. ती एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये घेते. फोर्ब्सच्या या यादीत ती पहिल्या क्रमांकावर आहे.