Forbesच्या मूल्यवान ब्रँड लिस्टमध्ये Apple नंबर वन

Jul 29, 2020, 15:00 PM IST
1/6

फोर्ब्सने Forbes जगातील सर्वात मूल्यवान ब्रँडची वार्षिक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये Apple कंपनीने पहिलं स्थान मिळवलं आहे. IANSनुसार, Appleने 24120 कोटी डॉलर्सची ब्रँड व्हॅल्यू नोंदविली असून ती गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष 2019 पासून आतापर्यंत, पहिल्या 100 कंपन्यांचा समावेश फोर्ब्सच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

2/6

फोर्ब्सच्या या यादीमध्ये 20750 कोटी डॉलर्ससह, गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांच्या वाढीने गूगल Google दुसऱ्या स्थानावर आहे. तर 16300 कोटी डॉलर्स, 30 टक्के वाढीसह मायक्रोसॉफ्ट Microsoft तिसऱ्या क्रमांकावर आहे.   

3/6

Forbesच्या टॉप 100 मूल्यवान ब्रँडची एकूण किंमत 2,54,000 कोटी डॉलर इतकी आहे.  

4/6

टॉप 100 मूल्यवान कंपन्यांच्या यादीमध्ये अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. या यादीमध्ये अमेरिकेच्या 50हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे.

5/6

IANSनुसार, फोर्ब्सच्या या लिस्टमध्ये 20 टेक्नोलॉजी सेक्टर, 14 फायनेंशियल सर्व्हिशीसंबंधीत कंपन्या, 11 ऑटो आणि 8 रिटेल कंपन्यांचा समावेश होता.

6/6

या लिस्टमध्ये Nintendo, बर्गर किंग, एक्सा या कंपन्यांनी स्थान मिळवलं आहे. तर फिलिप्स, Hewlett Packard, निसान या कंपन्या लिस्टमध्ये सामिल होऊ शकल्या नाहीत.