सोने 7600 रुपयांनी स्वस्त झाले, खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा

सोने दरात ( Gold Rate Today) सातत्याने घरसरण पाहायला मिळत आहे. आज जगभरात कोरोनाव्हायरसचा उद्रेक कमी होत आहे. तसतशी सोन्याची चमक फिकी पडत आहे. गेल्या दोन महिन्यांत सोने किंमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. डॉलरला बळकटी मिळत आहे. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या भावावर आणखी दबाव वाढला आहे. तथापि, चांदीमधील घट सोन्यापेक्षा कमी आहे.

| Mar 07, 2021, 10:05 AM IST
1/5

आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांदरम्यान सोने (Gold) 278 डॉलर प्रति औंस अर्थात 14.18 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 7,600 रुपयांनी घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत वायदा बाजारात चांदीही प्रतिकिलो 6000 रुपयांनी घसरली.

2/5

कमोडिटी मार्केटचे तज्ज्ञ केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, डॉलर मजबूत झाल्यावर आणि बाँडचे उत्पन्न वाढल्यानंतर गुंतवणूकदारांची सराफा बाजाराबद्दलची आवड कमी झाली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांतील शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी आहे. ते म्हणाले की कोरोना साथीच्या रोग आटोक्यात आणण्यासाठी लस बाजारात आली. ही लस आल्यापासून सोन्या-चांदीवरील दबाव वाढू लागला होता.

3/5

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लसीकरण कार्यक्रमाबद्दल सुरुवातीलाच चिंता होती. तथापि, लसीकरण कार्यक्रमाला गती मिळाल्यानंतर, आता ही चिंता देखील दूर झाली आहे आणि जगभरातील आर्थिक व्यापारात पटरीवर आल्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घटकांमुळे सोने आणि चांदीची तेजी मंदावली. शुक्रवारी, देशातील सर्वात मोठा वायदा बाजार असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)  सोने (Gold) भाव प्रति 10 ग्रॅम 44217 रुपयांनी घसरला. जो या वर्षीच्या दहा ग्रॅमच्या 51,875 रुपयांच्या उच्चांकावरून खाली आला आहे. 10 ग्राममध्ये 7,658 रुपयांनी अर्थात 14.76 टक्क्यांनी घसरला आहे. 

4/5

त्याचवेळी MCXवर चांदीचा दर प्रति किलो 64,790 रुपये घसरला. जानेवारीत चांदी सर्वोच्च पातळीवर दर होता. चांदी 70,864 रुपये प्रति किलो होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमेक्सवरील सोन्याच्या किंमती शुक्रवारी प्रति औंस 1,6844.05 डॉलर घसरल्या. यावर्षी जानेवारीला कॉमेक्सवरील सोने भाव 1,962.50 डॉलर प्रति औंस होता.

5/5

जागतिक बाजारात गेल्या दोन महिन्यांत सोने (Gold) दरात 278.45 डॉलर म्हणजेच 14.18 टक्क्यांनी घसरण झाली आहे.