Akshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू

Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

May 09, 2024, 13:42 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांचा कारक हा मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या लोकांनी अक्षय्य तृतीयेला तांबे किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

अक्षय्य तृतीयेला वृषभ राशीच्या लोकांनी चांदी किंवा सोन्याची नाणी खरेदी करणं शुभ मानलं जातं.   

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

अक्षय्य तृतीयेला या राशीच्या लोकांनी कांस्य धातूच्या वस्तू विकत घ्यावे. 

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांवर चंद्रदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यामुळे या लोकांनी चांदी खरेदी करणे फलदायी ठरतं. 

5/12

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या कारक ग्रह हा सूर्यदेव आहे. त्यामुळे या लोकांनी अक्षय्य तृतीयेला तांब्याचे वस्तू खरेदी करावे.

6/12

कन्या (Virgo Zodiac)

अक्षय्य तृतीयेला या लोकांनी कांस्य धातूच्या वस्तू खरेदी करणं लाभदायक ठरतं. 

7/12

तूळ (Libra Zodiac)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी चांदीच्या वस्तू नक्की घ्यावेत. 

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या राशीच्या लोकांनी तांब्याच्या वस्तू खरेदी करणे फलदायी ठरतं.

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांनी अक्षय्य तृतीयेला सोन्यासह पितळची वस्तू खरेदी करणे लाभदायक ठरतं. 

10/12

मकर (Capricorn Zodiac)

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्टील आणि लोखंडी वस्तू या लोकांनी खरेदी करावेत. शक्य असेल तर सोन्याचे दागिने खरेदी करणेही लाभदायक ठरतं. 

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला सोनं किंवा चांदीसोबत लोखंडी धातूच्या वस्तू खरेदी करणंही शुभ ठरतं. 

12/12

मीन (Pisces Zodiac)

या लोकांनी अक्षय्य तृतीयेला पितळ धातूच्या वस्तू खरेदी करणं लाभदायक ठरतं. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)