Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक

happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...

Jan 14, 2024, 12:19 PM IST
1/7

जर तुमची संक्रांत ऑफीसमध्ये साजरा करणार असाल तर ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही काळ्या साडीवर गळ्यात पातळ नेकलेस घालू शकता. 

2/7

जर तुम्ही काळ्या साडीवर गोल्डन ब्लाऊज घालणार असाल तर त्यावर गोल्डन किंवा डायमंड ज्वेलरी निवडा . ही ज्वेलरी हा काळ्या साडीसाठी आणि अर्थातच संक्रांतीसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.  

3/7

टेंपल ज्वेलरी

ही ज्वेलरी थोडी हेवी प्रकारातील असून यावर देवांची चित्रे असतात. तसेच मंदिरावर ज्याप्रमाणे नक्षीकाम केलेले असते तशाप्रकाची डिझाइन या दागिन्यावर असते. गोल्डन रंगाबरोबरच काही कलरफूल ज्वेलरीही या प्रकारात पाहायला मिळते. यामध्ये पारंपरिक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक तुम्ही कॅरी करु शकता. त्यामुळे टेंपल ज्वेलरी हा काळ्या साडीसाठी आणि अर्थातच संक्रांतीसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.  

4/7

टेराकोटा ज्वेलरी

अनेक कलाकार ही टेराकोटा ज्वेलरी हाताने पेंट करत असल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच डिझाइन पाहायला मिळतात. यातील कोणत्याही रंगाचे गळ्यातले आणि कानातले काळ्या रंगावर सूट होऊ शकत असल्याने ही ज्वेलरी नक्कीच छान दिसेल. टेराकोटा ज्वेलरीमध्ये लहान आकारातील गळ्यातल्या आणि कानातल्यापासून ते हेवी सेटपर्यंत बरेच पर्याय पाहायला मिळतात.. 

5/7

चोकर

संक्रांतीच्या दिवशी डिझायनर साडी नेसत असाल तर त्यावर फार हेवी ज्वेलरी चांगली दिसत नाही. अशावेळी एखादा चोकर घातला तरी तुमचा लूक खुलून येऊ शकतो. तुमच्या गळ्याभोवती असलेल्या या चोकरमध्ये कुंदन असतील तर तो आणखीनच छान खुलून दिसेल. कमीत कमी डिझाइन असलेला चोकर आणि त्यावरील कानातले याने तुम्ही संक्रांतीचा हटके लूक करु शकता.  

6/7

हेवी कानातले

काळा रंगाच्या साडीचा काठ थोडा मोठा असेल आणि आपण केस वर बांधणार असून तर थोडे हेवी मोठे कानातले घातले तर तुम्हाला मॉडर्न लूक मिळू शकेल. कानातले मोठे असतील तर गळ्यात काहीही घातले नाही तरी चालते. त्यामुळे तुमची साडी आणि कानातले हायलाइट होण्यास मदत होईल. 

7/7

ऑक्सिडाइज ज्वेलरी

ऑक्सिडाइज ज्वेलरीची बरीच फॅशन आहे. काहीशा काळपट पॉलिशमध्ये येणारे सिल्व्हर रंगातील हे दागिने काळ्या साडीवर अतिशय उठून दिसू शकतात. गळ्यात थोडा लांब असा टेंपल डिझाइन असलेला हार असेल तर तो आणखी छान दिसतो. काळ्या रंगावर ही ज्वेलरी अतिशय उठून दिसत असल्याने या लूकमध्ये तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आणि हटके दिसाल.