National Best Friend Day : मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा... निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील नात्याचा दिवस, 'बेस्ट फ्रेंड'ला द्या खास शुभेच्छा!

National Best Friend Day : मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा... निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील या नात्याची अशी कित्येक नाव आहेत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक नाती बनवतो. काही नाती जन्माने ठरवली जातात, तर मैत्रीसारखी नाती व्यक्ती स्वत: निवडतो. यामुळेच मैत्रीचं नातं खूप खास असतं. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. कोणत्याही परिस्थिती ही मंडळी आपल्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी असतात. आज मैत्रीचा दिवस नसला तरी राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे दरवर्षी 8 जूनला साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज तुमच्या बेस्ट फ्रेंडला हे खास मेसेज पाठवून हा दिवस आणखी खास करा. 

Jun 08, 2024, 10:02 AM IST
1/8

गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट, तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात  

2/8

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो… लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो… लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो.... Happy National Best Friends Day!  

3/8

नदीला आस असते पाण्याची डोळ्यांना आस असते अश्रूंची हृदयाला आस असते ठोक्यांची आपल्या नात्याला आस तुझ्या मैत्रीची! Happy National Best Friends Day!  

4/8

 जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारं समजते, ती म्हणजे मैत्री असते... नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा!  

5/8

 मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं Happy National Best Friends Day!  

6/8

काही नाती बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, त्यालाच तर मैत्री म्हणतात.... Happy National Best Friends Day!  

7/8

 मैत्री असावी मना-मनाची, मैत्री असावी जन्मो-जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी.... नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डेच्या शुभेच्छा!  

8/8

बंधनापलीकडे एक नाते असावे शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुःखाला तिथे थारा नसावा असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा Happy National Best Friends Day!