मायनस 30 डिग्री सेल्सियसमध्ये माणसाचाही बर्फ होईल; असल्या भयानक थंडीत साधू तब्बल 6 महिने करणार तपश्चर्या
Hindu Yogi Raeched Uttarakhand Gangotri Himalaya For Meditation : उत्तराखंडला देवांची भूमी, महान संतांची भूमी म्हटले जाते. आजही येथील गुहांमध्ये आहेत जे -5 ते -30 अंश सेल्सिअस तापमानात तपश्चर्या करतात. गंगेच्या लाटा देखील बर्फाच्या होतात अशा परिस्थितीत ते तपश्चर्या करतात. उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, यावर्षी 52 साधू गंगेचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री खोऱ्यात शून्याखालील तापमानात तपश्चर्या करण्यासाठी आले आहेत. महामारीमुळे 2020 आणि 2021 मध्ये गंगोत्री खोऱ्यात एकही साधू-संत आले नाहीत. शतकांनंतर ही परंपरा खंडित झाली होती.