होळी रे होळी...आपल्या प्रियजनांना द्या खास मराठीतून होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes in Marathi : पौर्णिमा तिथीला म्हणजे रविवारी 24 मार्चला होलिका दहन करण्यात येणार आहे. कोकणात पालखी सोहळा म्हणजे शिमग्याचा उत्साह असणार आहे. घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जाणार आहे. होळीचा सण म्हणजे वाईटवर चांगल्याचा विजयत्सोव. त्यामुळे मनातील नकारात्मकता, कडूता विसरुन आपल्या प्रियजन आणि कुटुंबातील सदस्यांना द्या खास मराठीतून होळीच्या शुभेच्छा (Happy Holi 2024)  

Mar 23, 2024, 15:13 PM IST
1/10

फाल्गुन पौर्णिमेला येते होळी नैवेद्याला पुरण पोळी देता जोरात आरोळी राख लावू कपाळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा  

2/10

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/10

रंगांची उधळण करत सण हा आला होळी पेटता उठल्या ज्वाळा वाईट प्रवृत्तींचा अंत हो झाला सण आनंदे साजरा केला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/10

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा !  

5/10

नवयुग होळीचा संदेश नवा झाडे लावा, झाडे जगवा करूया अग्निदेवतेची पूजा.. होळी सजवा गोव-यांनी होळीच्या हार्दिक शुभेच्छा  

6/10

 होळी पेटू दे रंग उधळू दे मतभेद मिटू दे प्रेमच प्रेम सर्वत्र बहरू दे होळीच्या हार्दिक शुभेच्छा  

7/10

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!  

8/10

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा  

9/10

ईडापीडा दुःख जाळी रे आज वर्षाची होळी आली रे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!  

10/10

दहन व्हावे वादाचे पूजावे श्रीफळ संवादाचे नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आज सण आहे होळीचा! होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा