रॉयल एनफिल्ड बुलेटच्या वर्चस्वाला होंडाचा मोठा धक्का; बाजारात आणली जबरदस्त बाईक

Honda CB350 Price and Features : रॉयल एनफिल्डचा भारतीय बाजारपेठेत इतका दबदबा आहे की 350cc सेगमेंटपासून 600cc सेगमेंटपर्यंत या एकाच कंपनीचे वर्चस्व आहे. पण आता हे वर्चस्व कितीकाळ टिकेल हे माहिती नाही कारण Honda लवकरच एक जबरदस्त बाईक बाजारात आणणार आहे, जी Royal Enfield च्या Classic 350 ला थेट टक्कर देईल.

Nov 17, 2023, 17:37 PM IST
1/7

रॉयल एनफिल्डला टक्कर

Honda CB350 Features

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने पुन्हा एकदा 350 सीसी सेगमेंटला लक्ष्य केले आहे.

2/7

भारतीय बाजारपेठेत लाँच

honda cb350 launch

यावेळी कंपनीने आपल्या नव्या उत्पादनात काही सुधारणाही केल्या आहेत. होंडाने आज आपली नवीन Honda CB 350 भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. होंडाने या बाईकचे नाव 'CB350' दिले आहे. रॉयल एनफिल्डच्या 350cc प्रमाणेच ही बाईक असणार आहे.

3/7

दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध

honda cb350 Available in two variants

कंपनीने ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. होंडाने ही बाईक आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगल्या किमतीत बाजारात आणली आहे.

4/7

लवकरच सुरु होणार डिलिव्हरी

honda cb350 Delivery

ही मध्यम आकाराची मोटरसायकल Honda BigWing डीलरशिपवर बुक केली जाऊ शकते आणि याची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.

5/7

पाच रंगांमध्ये उपलब्ध

honda cb350 colour

कंपनीने या बाईकला रेट्रो-मॉडर्न लुक दिला आहे. यात मस्क्यूलर फ्युएल टँक, स्टायलिश ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प आहेत. 

6/7

किंमत किती?

honda cb350 price

CB350 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल - DLX आणि DLX Pro. त्यांची किंमत 1,99,900 रुपये आणि एक्स-शोरूम रुपये 2,17,800 आहे.

7/7

इंजिन आणि परफॉर्मन्स

honda cb350 Engine and Performance

Honda CB 350 मध्ये, कंपनीने 348.36 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 5500 RPM वर 20.8 bhp ची पॉवर आणि 3000 RPM वर 29.4 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लच देखील देण्यात आला आहे.