Hyundai Creta च्या वरचढ ठरेल 'ही' कार; 11000 रुपयांपासून बुकिंग सुरु, तुम्ही कसली वाट पाहताय?

थेट सांगावं तर, तुम्ही कारचे अनेक पर्याय पाहिल्यानंतर सरतेशेवटी ह्युंडाई क्रेटावर येऊन थांबला असाल, तर आधी होंडाचा हा पर्याय पाहा. कारण, या कंपनीकडून एक तगडं मॉडेल 6 जूनला लाँच होऊ शकते.  

May 19, 2023, 15:44 PM IST

Honda Elevate Booking Details:  तुम्हीही कार घ्यायच्या बेतात असाल, तर आताच ही माहिती वाचून घ्या, किंवा सेव्ह करा. कारण, तुमच्या या निर्णयामध्ये ही माहिती मदतीची ठरणार आहे. 

1/7

भारतीय ऑटो क्षेत्र

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

कार घ्यायचा मुद्दा आला की, काही ब्रँड्सना हमखास पसंती मिळते. अशाच एका विश्वासार्ह ब्रँडनं कमाल कार तयार केली आहे. 

2/7

कोणाशी स्पर्धा?

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये होंडाची ही एलिवेट कार मारुती ग्रँड विटारा, ह्युंडाई क्रेटा, किआ सेल्टोस इत्यादी मॉडेल्सशी होणार आहे. दरम्यान, अद्याप कार लाँच होण्याची अधिकृत तारीख मात्र समोर आलेली नाही. 

3/7

11 ते 21 हजार रुपयांची टोकन अमाऊंट

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

सूत्रांच्या माहितीनुसार ही कार होंड्याच्या निवडक डिलरशिप शोरुममध्ये अवघ्या 11 ते 21 हजार रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुक करता येत आहे. अनेकांनीच आतापर्यंत ही कार बुक केलिये.   

4/7

हायब्रिड पॉवरट्रेन

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

शहरी रस्त्यांच्या दृष्टीनं कालांतरानं या कारला हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर करण्यात येईल. या कारच्या फिचर्सविषयी सांगावं तर, त्यामध्ये 1.5 लीटर हायब्रिड सेटअप, e-CVT ट्रांसमिशन असून ती 25kmpl इतकं मायलेज देते. 

5/7

टीझरमधून समोर आलेली झलक

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

कारच्या टीझरमधून समोर आलेली झलक पाहता तिच्यामध्ये ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, एंबियंट लाइटिंग सिस्टम, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, प्रीमियम ऑडियो सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिविटी, डिजिटल ड्राइवर डिस्प्ले, रियर एसी वेंट्स आणि टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम असे फिचर्स आहेत.   

6/7

एडवांस ड्राइवर असिस्टेंस सिस्टीम

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

एडवांस ड्राइवर असिस्टेंस सिस्टीमही या कारला दिली जाऊ शकते. पण, यावरून कार लाँच झाल्यानंतरच पडदा उठेल. इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टम, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर असिस्ट, लो स्पीड फॉलो फंक्शन, ऑटोमॅटिक हाय बीम हे या कारचे अॅडिशनच फिचर्स असतील.   

7/7

फिचर्स

Honda Elevate compete with Hyundai Creta know price and other details

अफलातून फिचर्स पाहता आता कार घेण्यापूर्वी तुम्ही हे मॉडेवलही विचारात नक्की घ्या. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)