Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?

Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत. 

Oct 04, 2023, 18:00 PM IST

Chia Seeds : लहान लहान काळ्या बियाचं सेवन केल्यास वजन कमी होऊ शकतं. साल्विया हिस्पॅनिकच्या या काळ्या बिया म्हणजे मध्य आणि दक्षिण मेक्सिकोमधील एक फुलांची वनस्पतीच्या आहेत.  चिया बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे, आहारातील फायबर, प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या आवश्यक पोषक घटक आहेत. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन केलं जातं. 

1/7

चिया सीड्समधील पोषक घटनांमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याासारखं वाटतं आणि तुम्हाला कमी भूक लागते. शिवाय तुमची कॅलरी कमी होण्यास मदत होते.   

2/7

दोन चमचे चिया बिया खाल्ल्याने तुम्हाला जवळपास 10 ग्रॅम फायबर मिळतं. 2015 च्या एका अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की दररोज 30 ग्रॅम फायबर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

3/7

अभ्यासातून असं दिसून आलंय की चिया सिड्सचं सेवन केल्याने व्हिसेरल ऍडिपोज टिश्यूज कमी होतं म्हणजेच बेली फॅट कमी होण्यास मदत होते.   

4/7

चिया सिड्सचं सेवन करण्यापूर्वी त्याला अंकुरित करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही पाणी किंवा दही, दूधात भिजवून त्याचं सेवन करावं. 

5/7

चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होतं, असं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यासाठी रात्रभर शक्य झालं नाही तर अर्धा तास भिजवलेल्या चिया सीड्स खाल्ल्याने पोटाची चरभी कमी होण्यास मदत होते. 

6/7

चिया सीड्स स्मूदी बनवूनही जास्त प्रमाणात खाल्ली जाते. फळांसह चिया सीड्स स्मूदी देखील चवदार लागते. 

7/7

ओट्ससोबत चिया सीड्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो. हे दोन्ही कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले पदार्थ असल्याने नाश्तात याचं सेवन करावं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)