टोलचा झोल नेमका कसा होतो? सरकारनं लक्ष दिल्यास 50% टोल बंद होतील

वाढत्या टोलवाढीमुळे वाहन चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशातच आता टोलचा झोल उघड झाला आहे. 

Oct 08, 2023, 21:49 PM IST

 Toll Plaza in Maharashtra : सरकारनं लक्ष दिल्यास 50% टोल बंद होतील, असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक विवेक वेलणकरांनी स्पष्ट केलंय.. टोलवसुलीची माहिती संकेतस्थळावरून दिली पाहिजे, असं परिपत्रक केंद्र सरकारनं २०१३ साली काढलं होतं. मात्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली, याकडंही वेलणकर यांनी लक्ष वेधले. 

1/11

राज्य सरकार आणि केंद्र सरकार टोल च्या नावाखाली लूट करत आहे. पेट्रोल आणि डिझेल त्याचबरोबर वाहनांमधून मिळणारा टॅक्स जातो कुठे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

2/11

कंत्राटदाराला या दोन्ही रस्त्यांवर मिळून, १५ वर्षांत ४३३० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते.

3/11

मुंबई-पुणे रस्त्याचे २००४मध्ये झालेले कंत्राट. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुना मुंबई-पुणे रस्ता याचे टोल गोळा करण्याचे १५ वर्षांचे कंत्राट करण्यात आले.

4/11

धिक रक्कम मिळाली, तर ती सरकार दरबारी जमा करण्याची तरतूद मात्र कंत्राटात नसते.

5/11

त्या कालावधीत कंत्राटदाराला त्याचा फायदा गृहीत धरून किती रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

6/11

बहुसंख्य टोल कंत्राटे ही विशिष्ट कालावधीसाठी असतात.

7/11

ही माहिती प्रसिद्ध व्हायला लागली आणि कंत्राटे करताना काय गडबडी केल्या जातात, ते कळायला लागले. 

8/11

महाराष्ट्रातील सर्व टोल कंत्राटे व दर महा प्रत्येक टोल नाक्यावरून जाणारी वाहने, जमा टोल यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.

9/11

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या केंद्र सरकारच्या विभागापासून सर्व राज्य सरकारांनी त्याला केराची टोपली दाखवली. 

10/11

2013  मध्ये केंद्र सरकारने ही सर्व माहिती स्वतःहून संकेतस्थळावर प्रसिद्ध केली पाहिजे, असे परीपत्रक काढले होते. 

11/11

टोल कंत्राटांपासून, ते टोल किती गोळा झाला, येथपर्यंतची कोणतीच माहिती नागरिकांना समजत नाही.