पुणे मेट्रोचे तिकीट किती? मुंबई, दिल्ली मेट्रो पेक्षा स्वस्त आहे का? जाणून घ्या

मेट्रोमुळे पुणेकरांची ट्राफिक जाममधून सुटका होणार आहे. पुणेकरांना ही मेट्रो निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. 

Jul 31, 2023, 22:47 PM IST

Pune Metro Ticket Price : बहु प्रतिक्षित मेट्रो अखेर पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुण्यात गरवारे कॉलेज ते रुबी हॉस्पिटल तसंच फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या विस्तारित मार्ग प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे  उद्घाटन  होणार आहे.  जाणून घ्या  पुणे मेट्रोचे तिकीट किती आहे.

1/7

पिंपरी चिंचवड ते पीएमसी अथवा पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत 30 रुपये तिकीट असणार आहे. 

2/7

वानज ते शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट तसेच पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत 25 रुपये तिकीट आहे. 

3/7

वनाज ते डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, पीएमसी स्थानक यासाठी 20 रुपये तिकीट आहे.  

4/7

रुबी हॉल ते पिंपरी चिंचवडचे तिकीट 30 रुपये आहे. 

5/7

रुबी हॉल ते वनाज स्टेशनपर्यंतचे तिकीट 25 रुपये आहे. 

6/7

रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना तिकीट 20 रुपये आहे. 

7/7

रुबी हॉल ते शिवाजी नगर स्टेशनचे तिकीट 15 रुपये आहे.