अखेरच्या क्षणी ITR भरताय? पाहा ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती

31 जुलै 2023 ही ITR फाईल करण्याची अखेरची तारीख असून, तुम्हीही आयटीआर न भरलेल्यांच्या यादीत येत असाल तर आताच ही प्रक्रिया पूर्ण करा. कारण, पुढे तुम्हाला याच ITR फाईलिंगची मोठी मदतही होणार आहे. दरम्यान, यंदा 6 कोटीहून अधिक नागरिकांनी आयटीआर फाईल केला आहे. 

Jul 31, 2023, 07:21 AM IST

How to file income tax return online : केंद्र शासनाकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची मुदतवाढ आता अखेरच्या टप्प्यात आली असून, या प्रक्रियेसाठी केंद्राकडून आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता तशी कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे. 

1/7

How to file income tax return online

How to file file income tax return online on last day

How to file income tax return online : आता हा इनकम टॅक्स रिटर्न नेमका फाईल कसा करायचा, त्यासाठीची प्रक्रिया काय, हे सर्व कोण करून देणार? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर, आताच एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अगदी घरच्या घरीही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

2/7

टाळाटाळ नकोच

How to file file income tax return online on last day

बरं, नंतर भरू म्हणत आयटीआर भरणं टाळू नका, कारण असं केल्या तुम्ही दंडास पात्र ठराल आणि करदाते म्हणून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 

3/7

आवश्यक कागदपत्र

How to file file income tax return online on last day

आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, फॉर्म 16, फॉर्म 26AS असणं गरजेचं आहे. याशिवाय बँक खाते क्रमांक गुंतवणुकीची माहिती असा तपशील असणंही गरजेचं आहे. 

4/7

संकेतस्थळ

How to file file income tax return online on last day

राहिला मुद्दा ITR File करण्याचा, तर सर्वप्रथम इनकम टॅक्सच्या संकेतस्थळाला भेट द्या. आता इथं पॅन आणि धारा क्रमांक वापरत तुमच्या खात्यात लॉगईन करा. तिथं ई फाइलिंगचा पर्याय निवडा. 

5/7

आयटीआर फॉर्म

How to file file income tax return online on last day

ज्या वर्षासाठी आयटीआर फाईल करत आहात तिथं आयटीआर फॉर्म क्रमांक, सबमिशन मोड निवडा आणि आवश्य तपशील भरा. तुमची अर्ध्याहून अधिक माहिती फॉर्म 16 आणि पॅनच्या आधारे तिथं भरलेली असेल. एकदा ती तपासून पाहा. 

6/7

गुंतवणूक आहे का?

How to file file income tax return online on last day

तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे का, पगारातील Deductions नमूद आहेत का, नसल्यास ते करण्यावर लक्ष द्या. टप्प्याटप्प्यानं माहिती भरून पुढे आल्यानंतर अखेरच्या टप्प्यात संपूर्ण माहितीचा संक्षिप्त तपशील तुमच्यासमोर येईल. तोसुद्धा तपासून घ्या. 

7/7

Proceed to validation

How to file file income tax return online on last day

पुढे Proceed to validation हा पर्याय निवडा आणि लागलीच ई वेरिफिकेशनही करून घ्या. यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा. साधारण अर्ध्या तासातच तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.