तुमच्याही घरात उंदरांनी उच्छाद मांडलाय? 'या' 4 ट्रीकमुळे होतील छुमंतर

| Jun 08, 2024, 16:48 PM IST
1/7

तुमच्याही घरात उंदरांनी उच्छाद मांडलाय? 'या' 4 ट्रीकमुळे होतील छुमंतर

How to Get Rid of Rats Utility Marathi News

Escape Rats Without Killing: तुमच्या घरातही उंदीरांनी उच्छाद मांडलाय का? घराच्या कानाकोपऱ्यात उंदीर घुसतात आणि अन्नाची नासधूस करतात. तुम्हीपण या गोष्टींना कंटाळा आला आहात का? असे असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. ज्याद्वारे तुम्ही उंदरांना न मारता घराबाहेर काढू शकता.

2/7

अन्नधान्याची नासाडी

How to Get Rid of Rats Utility Marathi News

घरात घुसलेल्या उंदराना आपण कधी पळवून लावतो असे प्रत्येकाला वाटते. कारण उंदरामुळे होणारे नुकसान खूप असते. ते अन्नधान्याची नासाडी करतात, घरात घुसून कपडे कुरतडतात आणि घरातील इतर वस्तूंचेही नुकसान करतात. 

3/7

बाप्पाचे वाहन

How to Get Rid of Rats Utility Marathi News

उंदराला बाप्पाचे वाहन म्हणून संबोधले जात असल्याने कोणी उंदीर मारत नाही. त्यामुळे तुम्ही उंदरांना न मारताही घराबाहेर काढू शकता. यासाठी पुढच्या ट्रीक्स तुमच्या कामी येतील. 

4/7

कापूर ठेवा

How to Get Rid of Rats Utility Marathi News

कापूरच्या मदतीने उंदरांना न मारता घराबाहेर काढू शकता. घरातील कोपऱ्यात किंवा जिथून उंदीर येजा करतात त्याजागेवर कापूर ठेवा. उंदीर तुमच्या घरापासून दूरच राहीलं. कारण उंदरांना कापूरचा वास आवडत नाही त्यामुळे कापूर असेल अशा ठिकाणापासून ते अंतर ठेवून राहतील.

5/7

ब्रेडमध्ये थोडं दही

How to Get Rid of Rats Utility Marathi News

उंदीर पकडण्यासाठी लोक पिंजरे लावतात पण उंदीर खूप हुशार असतात. अनेक दिवस पिंजरा पडून राहतो पण ते काही त्यात अडकत नाहीत, हे तुम्ही पाहिले असेल. पण आता जेव्हा तुम्ही कधी पिंजरा लावाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. पिंजऱ्यात ठेवलेल्या ब्रेडमध्ये थोडं दही टाका, त्याचा वास घेऊन उंदीर लवकर पिंजऱ्यात अडकतो.

6/7

तुरटीची पावडर

How to Get Rid of Rats Utility Marathi News

जर तुमच्या घरात उंदीर शिरला असेल तुरटीचा मार्ग निवडा. तुरटीची पावडर बनवा. त्यानंतर ही तयार पावडर थोड्या पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. त्यानंतर ज्या ठिकाणी उंदीर दिसतो त्या ठिकाणी हे द्रावण फवारा. किंवा घराच्या कोपऱ्यातही तुरटी पावडरची फवारणी करू शकता.

7/7

पुदीना

How to Get Rid of Rats Utility Marathi News

घरातून उंदीर हाकलण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापर करु शकता. उंदरांचा वावर असेल अशा घरातील कोपऱ्यात आणि इतर ठिकाणी तुम्हाला पुदीना ठेवायचाय. मग येथे उंदीर आले की लगेच घराबाहेर पळतील. कारण उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही.