मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण कसं देणार? कुणबी नोंदी असलेल्या वंशावळी तपासणार

राज्य सरकारनं आता मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आणण्याचं ठरवलेलं दिसतंय.

Sep 04, 2023, 22:02 PM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं बोलावलेली बैठक पार पडली. जालना आंदोलनकर्त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं यासाठी शासन सकारात्मक असल्याचा सूर बैठकीत उमटलाय. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारनं मोठं पाऊल टाकलंय. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण कसं देणार? जाणून घेवूया.

1/7

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दीड वर्षांचा काळ उरलाय.. त्याआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा खटाटोप आहे.

2/7

सुप्रीम कोर्टानं स्वतंत्र प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी फेटाळल्यानंतर, आता ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मराठा संघटनांची मागणी आहे.

3/7

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय.

4/7

मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर कुणबीऐवजी त्यांची गणना उच्चवर्णीय मराठा समाजात होऊ लागली. 

5/7

हैदराबाद संस्थान असताना तिथल्या मराठा समाजाची गणना ही कुणबी म्हणजे इतर मागासवर्गात होत होती.

6/7

11 सदस्यांची समिती निजामाच्या काळापासूनची कागदपत्रं, मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती, जुने रेकॉर्डस् यांची पडताळणी करून पुढील ३ महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे. 

7/7

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलेत.