रशियाचे Luna-25 कोसळल्यामुळे चंद्रावर पडला 33 फूट रुंद खड्डा

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीच रशियाचे यान क्रॅश झाले होते. 

Sep 04, 2023, 21:22 PM IST

Luna-25 : भारताचे चांद्रयान 3 लाँच झाल्यानंतर रशियाने देखील आपले  Luna-25 हे यान लाँच केले. भारतीय चांद्रयान 3 सोबत स्पर्धा करत आधी तिथं पोहोचण्याचा खटाटोप केला. मात्र, दुर्दैवानं रशियाचं यान चंद्रावर क्रॅश झालं. यानंतर चंद्रावर  33 फूट रुंद खड्डा पडला आहे.

1/7

 रशियाचं यान चंद्रावर क्रॅश झालं. रशियाचं स्वप्न भंगलं. भारतानं मात्र चांद्रयान 3 यशस्वीपणं दक्षिण ध्रुवावर उतरवून तिथं तिरंगा फडकावला.

2/7

 रशियाचे यान कोसळले ती जागा आता नासाने शोधून काढली. चंद्रावर  33 फूट रुंद खड्डा आढळला आहे. हा खड्डा रशियाचे यान कोसळल्यामुळे पडला असल्याचा दावा NASA ने केला आहे. NASA Lunar Reconnaissance Orbiter खड्ड्याचा हा फोटो टिपला आहे.

3/7

लूना-25 कक्षा बदलण्याताना अयशस्वी झाल्याने त्यामुळे ते भरकटले. रशियन स्पेस एजन्सीचा लुना-25 शी संपर्क तुटल. यानंतर यान चंद्रावर कोसळले.

4/7

20 ऑगस्ट 2023 लँंडिगआधी रशियाच्या मिशन लुना-25 मध्ये तांत्रिक बिघाड झाला.   

5/7

21 किंवा 22  ऑगस्ट 2023 रोजी  रशियाचे लूना-25 हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते.   

6/7

रशियाचे लूना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. 

7/7

रशियाचे Luna-25 कोसळल्यामुळे चंद्रावर पडला  33 फूट रुंद खड्डा पडला असून याचे फोटो नासाने ट्विटरवर शेअर केले  आहेत.