Kitchen Tips : फोडलेल्या पाकिटातील मशरूम आठवडाभर टिकवण्यासाठी करा हा सोपा उपाय

kitchen tips: पाकिटातून जेव्हा मशरूम काढतो तेव्हा ते फ्रेश असतात मात्र सर्व एकत्र वापरले नाही आणि फ्रीझमध्ये ठेवले तर ते लगेच काळे पडतात, मग अश्यावेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही ते खराब होण्यापासून वाचवू शकता

Jan 26, 2023, 18:18 PM IST

kitchen tips: मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात जी शरीराच्या वाढीसाठी अत्यंत  महत्वाची असतात.  रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपल्याला निरोगी ठेवण्यास मशरूम खूप फायदेशीर आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की बाजारातून आणल्यावर मशरूम लगेच खराब होतात. अशावेळी काही टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही मशरूम खराब होण्यापासून वाचवू शकता.

1/4

एक हवाबंद डब्बा घ्या त्यात एक टिश्यू पेपर व्यवस्थित सगळीकडे पसरवून ठेवा. आता या टिश्यू पेपरवर मशरूम व्यवस्थित ठेऊन द्या.

2/4

मशरूम ठेवल्यानंतर त्यावर दुसरा टिश्यू पेपर ठेऊन द्या, दुसऱ्या टिश्यू पेपरने सर्व मशरूम व्यवथित झाकून ठेवा. 

3/4

आता डब्याचं झाकण अगदी घट्ट बसवून तो फ्रिजमध्ये ठेऊन द्या.

4/4

हा उपाय करून तुम्ही जवळपास 1 आठवडा मशरूम अगदी व्यवस्थित टिकवू शकता. आठवडाभर  फ्रेश मशरूम वापरू शकता.