यंदा गणेशचतुर्थीला बनवा खुसखुशीत साटोऱ्या, पारंपारिक व झटपट होणारी रेसिपी वाचा

बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पासाठी या दिवसांत काही खास गोडाचे पदार्थ केले जातात. त्यासाठीच खव्याच्या साटोऱ्या कशा करायच्या, याची रेसिपी जाणून घ्या. 

| Aug 30, 2024, 14:23 PM IST

Ganesh Festival 2024: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पासाठी या दिवसांत काही खास गोडाचे पदार्थ केले जातात. त्यासाठीच खव्याच्या साटोऱ्या कशा करायच्या, याची रेसिपी जाणून घ्या. 

1/7

यंदा गणेशचतुर्थीला बनवा खुसखुशीत साटोऱ्या, पारंपारिक व झटपट होणारी रेसिपी वाचा

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच ज्येष्ठागौरी येतात. जेष्ठागौरींना अनेकजण साटोऱ्याचा नैवेद्य दाखवतात. पण या साटोऱ्या कशा करायच्या याची रेसिपी जाणून घ्या. 

2/7

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

खव्याच्या साटोऱ्या या पौष्टिक तर असतातच पण गर्भवती स्त्रिया आणि वयोवृद्धांसाठी देखील खूप गुणकारी आहेत. साटोऱ्या बनवण्याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या. 

3/7

साहित्य

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

साटोऱ्या बनवण्यासाठी पाव किलो खवा, पिठीसाखर एक वाटी, वेलची पूड, कणिक एक वाटी, अर्धा वाटी रवा, चिमुटभर मीठ 

4/7

कृती

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

सगळ्यात पहिले एका पातेल्यात खवा गरम करुन घ्या. त्यानंतर थोडा पातळ झाल्यानंतर त्यात साखर घालून एकजीव करा. साखर संपूर्ण वितळु द्या. नंतर गार होण्यासाठी ठेवा 

5/7

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

पुरीसाठी कणिक व रवा एकत्र करुन त्यात तेल व मीठ घालून मळून घ्या. पीठ चांगले मळून घेतल्यानंतर ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा जेणेकरुन ते कडक होणार नाही.   

6/7

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

 आता साटोऱ्या करायला घेऊयात. खव्याचे लहान गोळे करुन घ्या. त्याचबरोबर कणकेचेही गोळे करुन घ्या. पुरीइतकी कणकेची पारी लाटून त्यात खव्याचा गोळा घालून बंद करुन घ्या 

7/7

how to make Satori Ganesh Chaturthi Special Sweets Recipe in marathi

आता हलक्या हाताने साटोऱ्या लाटून घ्या. नंतर तव्यावर थोडेसे भाजून घ्या. जेणेकरुन तळताना त्यातील सारण बाहेर पडणार नाही. भाजून झाल्यानंतर साटोऱ्या तेलात तळून घ्या. खुसखुशीत साटोरी तयार.