फ्रिज वापरताना 7 महत्वाचे बदल करा, आत्तापेक्षा निम्म होईल बिल

Fridge Use Tips : फ्रिज वापरताना काळजी घेतली तर विजेचं बिल निम्म्यापद्धतीने कमी होईल. स्मार्टली फ्रिजचा वापर करा. 

| Oct 11, 2023, 13:21 PM IST

How To Save Electricity Bill :  रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रिज हा घरातील असा होम अप्लायन्स ज्याचा वीज बिलावर होतो मोठा परिणाम. वीज बिलाचा 15 टक्के भाग हा फ्रिजमुळे येतो. अशावेळी स्मार्टली फ्रिजचा वापर करणे तुमचं वीज बिल कमी करण्यासाठी मदत करतात. फ्रिज खरेदी करताना BEE 5 स्टार रेटिंग असलेला फ्रिज खरेदी करणे हा त्यातील एक उत्तम मार्ग आहे. तरीही फ्रिजमुळे बील कमी करणे शक्य आहे. 

1/7

फ्रिज विनाकारण बंद करू नका

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

अनेकजणांना फ्रिजमुळे विजेचं बिल अधिक येतं अस वाटत असताना बाहेर जाताना बंद करतात किंवा पावसामध्ये फ्रिज बंद ठेवतात. पण असं केल्याने फ्रिज पुन्हा सुरू केल्यानंतर तो थंड होण्यासाठी तितकीच वीज वापरतो. त्यामुळे फार काही फायदा होत नाही. 

2/7

फ्रिज पूर्ण भरू नका

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

फ्रिज कधीही अगदी तुबूंड भरू नका. यामुळे थंड हवेचा फ्लो पास होताना अडथळा निर्माण होतो. यामुळे फ्रिजच्या एफिशियंसीवर परिणाम होतो. मोकळी जागा असल्यास रेफ्रिजरेटर अतिशय छान कूल होतो. 

3/7

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

फ्रिजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना त्याचे तापमान रूम टेम्प्रेचरला येईल तोपर्यंत वाट बघा. कारण फ्रीजमध्ये गरम पदार्थ ठेवल्यास तो थंड व्हायला वेळ लागतो. तसेच फ्रिज पूर्ण टोकापर्यंत भरू नका किंवा पदार्थ अगदी मागे फ्रिजला टेकून ठेवू नका. यामुळे हवा खेळती राहत नाही. 

4/7

विनाकारण फ्रिज खोलू नका

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

उगाच कारण नसतानाही घरातील इतर मंडळींना देखील फ्रिज उघड-झाप करण्याची सवय असते. ही सवय विजेचं बिल अधिक येण्यासाठी कारणीभूत ठरते. जितक्यांदा तुम्ही फ्रिज उघडाल तितक्यांदा गरम हवा फ्रिजमध्ये जाते. फ्रिज थंड होण्यासाठी पुन्हा एकदा जास्त विज खेचते. 

5/7

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

फ्रिजमध्ये कोणताही पदार्थ ठेवताना त्याचे तापमान रूम टेम्प्रेचरला येईल तोपर्यंत वाट बघा. कारण फ्रीजमध्ये गरम पदार्थ ठेवल्यास तो थंड व्हायला वेळ लागतो. तसेच फ्रिज पूर्ण टोकापर्यंत भरू नका किंवा पदार्थ अगदी मागे फ्रिजला टेकून ठेवू नका. यामुळे हवा खेळती राहत नाही. 

6/7

फ्रिज आणि भिंतीमध्ये असावं अंतर

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

फ्रिज आणि भितींमध्ये किती अंतर असावं? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. फ्रिज आणि भिंतीमध्ये 6 ते 10 इंचाचे अंतर असावे

7/7

पदार्थांवर झाकण ठेवा

how to use refrigerator efficiently to save electricity know 7 Tips

अनेकांना फ्रिजमध्ये पदार्थ उघडे ठेवण्याची सवय असते. पण ही एक सामान्य चुकच विजेचं बिल अधिक यायला घातक असते. वीज बिल आटोक्यात आणायचे असेल तर पदार्थ झाकून ठेवा किंवा डब्यांमध्ये ठेवा.