भारतातील श्रीमंताच्या यादीत शाहरुखचे नाव, फक्त चित्रपटच नाही तर अंबानी, अदानींसारखं व्यवसायातून करतो कोट्यावधीची कमाई

भारतातील श्रीमंताच्या यादीत शाहरुखने स्थान मिळवले आहे. जाणून घेऊया शाहरुखची संपत्ती किती आहे. 

| Aug 29, 2024, 17:43 PM IST

Hurun India Rich List 2024 : हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलीवूड 'बादशाह' शाहरुख खानने एन्ट्री केली आहे. शहारुख सह बॉलीवूडमधील आणखी काही सेलिब्रिटींचा यात समावेश झाला आहे. 2024 मध्ये शाहरुखची संपत्ती 7,300 कोटी इतकी आहे. 

1/7

 शाहरुख फक्त यशस्वी अभिनेताच नाही तर तो एक यशस्वी उद्योजक देखील आहे. शाहरुखने व्यवसायातून तगडी कमाई केली आहे. 

2/7

भारतातील या श्रीमंताच्या यादीत   एचसीएलचे शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  चौथ्या क्रमांकावर सिरम इंस्टीट्यूटचे सायरस पूनावाला, पाचव्या क्रमांकावर सन फार्माचे दिलीप सांघवी, सहाव्या स्थानावर आदित्य बिर्ला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला, सातव्या स्थानावर हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा, आणि त्यानंतर डिमार्टची मुख्य कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टचे मालक  राधाकिशन दमानी, विप्रोचे अझीम प्रेमजी आणि बजाज उद्योगसमुहाचे निरज बजाज यांचा अनुक्रमे आठवे,  नववे , दहावे स्थान मिळविले आहे.

3/7

या यादीत पहिल्यांदाच शाहरुख खानसह जुही चावला, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश झाला आहे. 

4/7

 रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इंडियन प्रीमियर लीग या दोन्ही कंपनीच्या माध्यमातून शाहरुख तगडी कमाई करतो.  केकेआरने या वर्षी आयपीएल विजेतेपद पटकावले त्यामुळे या फ्रॅंचायझीची मुल्य वाढले आहे. यामुळे शाहरुख मालामाल झाला आहे. 

5/7

शाहरुखच्या दोन मोठ्या कंपन्याचा मालक आहे.  रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनी चित्रपटनिर्मिती करते. तर दुसरी कंपनी ज्यामध्ये शाहरुख सहमालक आहे ती म्हणजे   इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आहे. 

6/7

 शाहरुखने 7,300 कोटींच्या संपत्तीसह हुरुन इंडियन रिच लिस्टमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे. 

7/7

 हुरुन इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं आहे.