Relationship : नवरा-बायकोचे असतात 9 प्रकार, तुमचा जोडीदार कसा?

नवरा बायकोचं नातं हे जगातील अनोखं नातं आहे. कितीही भांडलात तरी एकमेकांना हवंहवंस वाटणार असं हे नातं. या नात्याचे देखील प्रकार असतात. ते प्रकार कोणते पाहा आणि तुम्ही कशात येता? ते समजून घ्या. 

| Oct 22, 2024, 13:04 PM IST

प्रत्येक नात्यात एक वेगळेपण असतं. असंच एक नातं म्हणजे नवरा-बायकोचं. या नात्यात दोन वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती अनेकवर्ष एकत्र राहतात. अनोळखी व्यक्तीसोबत संसार करत असताना अनेकदा ते कपल एकसारखंच दिसतं असं संशोधन म्हणतं. एकमेकांवर इतका प्रभाव पाडणारं हे नातं आणि त्या नात्याचे 9 प्रकार. 

नवरा-बायकोच्या नात्याचे 9 प्रकार, त्या प्रकारातील वेगळेपण काय? ते आज जाणून घेऊया. या 9 प्रकारातील कोणत्या प्रकारात तुम्ही आणि तुमचा जोडीदार आहात?

1/9

हम साथ साथ है

नवरा-बायकोच्या नात्यातील हा एक प्रकार. या प्रकारात हे नवरा-बायको कायमच एकमेकांसोबत असतात. म्हणजे प्रसंग कोणताही असो किंवा कुठेही जाणं असो हे कपल एकत्रच असतात. म्हणजे या कपलला एकमेकांसोबत लोकांनी इतक्यांना पाहिलं असतं की, त्यांना देखील यांना एकत्रच बघण्याची सवय लागली असते. 

2/9

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना

नवरा-बायकोचं नातं अनोख असतं. त्यामध्ये नोकझोक ही असतेच. एकमेकांच्या बऱ्याच गोष्टी पटत नाही पण एकमेकांशिवाय राहणं त्यांना अशक्य असतात. प्रेमांत भांडण असतात, राग असतो पण यांना एकमेकांचा साथ कायम हवा हवासा वाटतो. 

3/9

पॉवरफूल कपल

नवरा-बायकोच्या नात हे अतिशय महत्त्वाचं असतं. पण काही जोडपी अशी असतात जी अतिशय पॉवरफूल कपल वाटतात. यांच्याकडे पाहिलं की, वाटतं लग्न करायला हवंच. या दोघांनी जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवलेला असतो. या जोडप्यामुळे लग्नाबाबत सकारात्मक विचार लोकं करु लागतात. 

4/9

बालपणीची मैत्री

अनेक जोडपे असे असतात जे एकमेकांना अगदी बालपणापासून ओळखतात. हे कपल एकत्र मोठे झालेले असतात. त्यामुळे त्यांची मैत्री एकत्र फुलते आणि त्या मैत्रीचं रुपांतर जोडीदारात होतं. एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्यामुळे या कपलच नातं अधिक चांगल खुलतं. 

5/9

बेस्ट फ्रेंड

नवरा-बायकोतील हा प्रकार खूप मजेशीर असतो. एकमेकांशी असलेली मैत्री इतकं घट्ट असते की, हे पुढील आयुष्य एकत्र आनंदाने घालवायला तयार होतात. या नात्यामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी एकसारख्या असतात किंवा एकमेकांना माहित असतात. त्यामुळे नातं पुढे नेण्यासाठी मदत करतात. 

6/9

एकमेकांच्या परस्पर विरुद्ध

नवरा-बायोकाच्या नात्यातील हा प्रकार थोडा मजेशीर असतो. या नात्यामध्ये जोडप्याच्या सवयी त्यांचे स्वभाव, आवडी निवडी सगळ्याच भिन्न असतात. पण तरी देखील या कपलचा संसार अतिशय आनंदी असतो. या दोघांना एकमेकांची साथ हवीहवीशी असते. 

7/9

प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे

काही कपल असे असतात, जे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असतात. त्यांना आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही. कायम एकमेकांची साथ हवीहवीशी वाटते. 

8/9

PDA जोडपं

नवरा-बायकोचा हा प्रकार थोडासा धोकादायक असतो. हे जोडीदार एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी लपून ठेवतात. प्रसंग, वेळ आणि माणसं बघून हे कपल एकमेकांशी वागत असतं. जगासमोर या जोडप्याचा दिवाखा वेगळा असतो. 

9/9

ओपन रिलेशनशिप कपल

नवरा-बायकोचं हे नातं फार ओपन माईंडेड म्हणून ओळखला जातं. एकमेकांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहण्याची कोणतीही अट या नात्यात नसते. एखमेकांसोबत असताना आपल्या जोडीदाराला जर कुणी दुसरा पार्टनर आवडत असेल तर हा बदल अतिशय प्रेमाने स्वीकारला जातो.