IAS Tina Dabi Ex नवरा पुन्हा करतोय लग्न, इंगेजमेंटचे फोटो व्हायरल..

IAS Athar Aamir Khan हा Dr.Mehreen Qazi सोबत लग्न करणार आहेत.

Jul 06, 2022, 17:59 PM IST

मुंबई : IAS Tina Dabi पासून घटस्फोट घेतल्यानंतर IAS Athar Aamir Khan हा Dr.Mehreen Qazi सोबत लग्न करणार आहे. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आज आम्ही तुम्हाला या लव्हबर्ड्सची फोटो दाखवणार आहोत.

1/6

आयएएस अतहर लवकरच लग्न करणार आसल्याच समजताच लाखो मुलींचं हार्ट ब्रेक झालंय. असं असतानाही अनेकांनी कमेंट करून या जोडप्याला अभिनंदन देखील केलं आहे. टीना डाबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आयएएस अतहर आमिर खान डॉक्टर मेहरीन काझीसोबत लग्न करणार आहे. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

2/6

अतहर हा देखील एक IAS अधिकारी आहे आणि 2015 मध्ये जेव्हा टीना डाबीने UPSC परीक्षेत टॉप केलं होतं, त्याच वर्षी अतहर आमिरने UPSC मध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. अथरने आयआयटी मंडीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे, त्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली.

3/6

अथरचे लग्न टीना डाबीशी झालं होत. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. टीना दाबी सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. टीना डाबीचं लग्न आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी झालं आहे. प्रदीप गावंडे हे राजस्थानच्या पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. टीना आणि प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

4/6

अतहर आमिर खानचे इंस्टाग्रामवर जवळपास 6 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरही अतहर आमिर खानला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

5/6

अतहरचं पूर्ण नाव अतहर अमीर-उल-शफी खान आहे. अतहरचा जन्म ५ सप्टेंबर १९९२ ला झाला. त्यांचा जन्म एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. अतहर अमीर हा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील देवीपुरा-मत्तन गावचा रहिवासी आहे.

6/6

त्याने श्रीनगरमधील शाळेतून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला. आयआयटीनंतर त्याने सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आमिरने 2009 मध्ये यूपीएससीमध्ये टॉप केलेल्या शाह फैसलचा सल्ला घेतला.