भगव्या रंगात रंगली टीम इंडिया, आता वर्ल्ड कप जिंकणार.. अजब योगायोग

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुढचे 46 दिवस क्रिकेट प्रेमींना रंगतदार सामन्यांची मेजवाणी मिळणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबरला सेमीफायनल तर 19 नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेची फायनल रंगणार आहे. 

Oct 05, 2023, 19:12 PM IST
1/8

2/8

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला येत्या 8 तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. 

3/8

विश्वचषक स्पर्धेआधीच भारतीय क्रिकेट संघाचे दोन्ही सराव सामना पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे टीम इंडिया थेट स्पर्धेत उतरणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. 

4/8

पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईमध्ये दाखल झाली असून खेळाडूंनी जोरदार सराव केला. सरावासाठी बीसीसीआयने नवी जर्सी लाँच केली आहे. 

5/8

टीम इंडियाची ही नवी जर्सी भगव्या रंगाची आहे. ही जर्सी परिधान करुन भारतीय खेळाडूंनी सराव केला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

6/8

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक कमेंट्स येत आहेत. काही जणांनी जर्सीचा रंग केसरी असल्याचं म्हटलं आहे. 

7/8

पण भगव्या जर्सीमुळे एक अजब योगायोग जुळून आला आहे. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने याच रंगाची जर्सी घालून सराव केला होता. या स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं होतं

8/8

2019 विश्चचषक स्पर्धेतही टीम इंडियाने भगव्या रंगाच्या जर्सीत सराव केला होता. इतकंच नाही तर एक सामनाही खेळला होता. या स्पर्धेत टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.