WTC 2021 Final: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' 3 खेळाडूंना मिळू शकते संधी

 घोडा मैदान अगदी जवळ आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 

Jun 17, 2021, 11:03 AM IST

मुंबई: घोडा मैदान अगदी जवळ आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 18 ते 22 जून दरम्यान साउथेप्टम इथे ड्युक बॉलने न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या बॉलर्सला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्पिनर्समध्ये रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा दोघांची जागा कन्फर्म असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या तीन खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे जाणून घ्या.

1/5

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहची कामगिरी इंग्लंड सीरिजपासून उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय टीमचा पेस अॅटॅक करण्यात माहीर आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडला जाण्याची शक्यता आहे. WTC 2021 मध्ये त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यात 34 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.   

2/5

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी बॉल स्विंग करण्यात माहीर आहे. त्याने 18 सामन्यांत 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे शमीला देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

3/5

इशांत शर्मा

इशांत शर्मा

भारतासाठी आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळणाऱ्या इशांतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने 36 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. 

4/5

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या कसोटी करियरची सुरुवात केली. त्याने 10 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. सिराज एक उत्तम अनुभवी खेळाडू मानला जातो त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

5/5

उमेश यादव

उमेश यादव

एक उत्तम गोलंदाज म्हणून उमेश यादवकडे पाहिलं जातं. शमी आणि इशांतसारखं त्याचं संघातील स्थान निश्चित असेल की नाही याबाबत आता तरी सांगता येणार नाही. कदाचित त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार नाही. मात्र त्याला एखाद्या सामन्यासाठी संधी देण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.