अश्या पद्धतीने 'आंबा' खाल्यास होणार नाही उष्णतेचा त्रास

Mango Season : आंबा हा उष्णतावर्धक आहे,गरमीच्या दिवसात अतिरिक्त आंबा खाल्याने चेहऱ्यावर फोड येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आंबा खाताना काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. 

Apr 14, 2024, 14:36 PM IST

ज्या त्या सिझनमध्ये येणारी फळं येणारी फळं खाणं शरीराला फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. एप्रिल-मे मधील उन्हाळा सुरु झाला की आंब्याचे वेध लागतात. इतर फळांच्या तुलनेत आंब्याची लोकप्रियता सर्वात जास्त आहे.

 

1/8

उन्हाळ्याच्या दिवसात कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात आमरस, कैरीचं पन्ह आणि आंबापोळी प्रामुख्याने खाल्ले जातात. चवीला गोड असणारा आंबा खाणं त्वचेसाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. 

2/8

आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. या पोषक घटकांमुळे चेहरा टवटवीत राहतो तसंच सुरकुत्या येण्याचं प्रमाणंही कमी होतं.   

3/8

आंब्यामध्ये व्हिटॅमिन 'ए'ची मात्रा अधिक असते त्यामुळे त्वचेप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबा गुणकारी मानला जातो.मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने त्याचे चेहऱ्यावर दुष्परिणाम सुद्धा होतात.

4/8

आंब्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने आंबा प्रमाणातच खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 

5/8

आंब्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने आंबा प्रमाणातच खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

6/8

आंबे खाण्यापूर्वी ते काही वेळ थंड पाण्यात ठेवावेत. स्वच्छ धुतल्याशिवाय आंबा खाऊ नये. 

7/8

तसंच रात्री आंबा खाणं टाळावं, त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचा त्रास जाणवतो. आंबा गरम असतो म्हणूनच रात्री खाऊ नये. असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं.   

8/8

बीटा-कॅरोटीन, कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी ,मॅंगीफेरिन आणि कोलेजन हे पोषक घटक आंब्यात जास्त प्रमाणात असल्याने नैसर्गिकरीत्या टॅन काढण्यासाठी याचा फायदा होतो. आंब्याच्या सालीचा फेसपॅक लावल्याने त्वचा नितळ होण्यासाठी मदत होते.