'या' कलाकारांनी IIFA 2022 गाजवत, दिग्गजांना ही टाकलं मागे...

दोन दिवसांचा हा कार्यक्रम असा काही रंगला की, पाहून असे वाटत होते की, जणू आकाशातीले तारे जमिनीवरचं अवतरले आहे.

Jun 05, 2022, 17:04 PM IST

नुकताच झालेला आयफा अवॉर्ड्सला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या संदर्भात अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायर झालेले तुम्ही पाहिले असेलच.  परंतु हा आयफा अवॉर्ड् नेमका कोणा-कोणाला मिळाला हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल किंवा जाणून घेण्याची इच्छा असेल, तर चला यादीतील नावं जाणून घेऊ या.

1/6

अभिनेत्री सई ताम्हणकरला 'मिमी' या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक (महिला) या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे.  

2/6

'लुडो' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक (पुरुष) भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पंकज त्रिपाठीला हा पुरस्कार मिळाला आहे.

3/6

'बंटी और बबली 2' या चित्रपटासाठी अभिनेत्री शर्वरी वाघला सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.

4/6

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) हा पुरस्कार बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याला 'तडप' या चित्रपटासाठी मिळाला आहे.

5/6

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा IIFA 2022 पुरस्कार, अभिनेत्री क्रिती सेननला तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.

6/6

 यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता विकी कौशलला त्याच्या 'सरदार उधम' या चित्रपटासाठी मिळाला. अभिनेत्याने आपला पुरस्कार दिवंगत अभिनेता 'इरफान खान'ला समर्पित केला, त्याचे कारण म्हणजे विक्कीच्या आधी ही भूमिका इरफान खान करणार होता.