तुमच्या दररोजच्या रूटीनमध्ये 'या' योगांचा करा समावेश; बद्धकोष्ठता त्रास होईल कमी

बद्धकोष्ठतेच्या उपचारात योगा ही एक प्रमुख आणि प्रभावी पद्धत मानली जाते. योगाच्या सरावाने शरीरातील क्रिया संतुलित करता येतात, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

Aug 19, 2023, 22:03 PM IST
1/5

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन

या आसनात पाठीवर झोपून पाय आकाशाकडे ठेवावे लागतात. हे आसन पोटात तयार होणारा वायू बाहेर टाकण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

2/5

पसारित पदोत्तानासन

पसारित पदोत्तानासन

या आसनात एक पाय वर उचलून तो सरळ खेचला जातो. हे पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते आणि पोट साफ करण्यास मदत करते.  

3/5

उत्तानासन

उत्तानासन

या आसनात पाय सरळ उघडून पुढे वाकावे लागते. हे ओटीपोटाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करू शकते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.  

4/5

पादहस्तासन

पादहस्तासन

या आसनात हळूहळू वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे ओटीपोटाचे स्नायू मजबूत करते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

5/5

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन

या आसनात पाय सरळ उघडून पुढे वाकावे लागते. हे ओटीपोटाचे स्नायू मजबूत करू शकते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करू शकते.