विमानात मोबाईल Flight Modeवर न ठेवल्यास काय होईल? जाणून घ्या

Flight Mode In Aeroplane: उड्डाणा दरम्यान पायलट संपूर्ण वेळ नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात. हा संपर्क रेडिओ लहरींद्वारे राखला जातो, जो विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये उपयुक्त आहे. 

| Aug 19, 2023, 18:29 PM IST

Flight Mode In Aeroplane: मोबाईल बंद किंवा फ्लाइट मोडवर नसल्यास वैमानिक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संवादात समस्या निर्माण होतात आणि नियंत्रण कक्षाकडून येणारी माहिती वैमानिकाला स्पष्टपणे मिळत नाही. त्यामुळे विमान उड्डाण करताना अडचणी निर्माण होऊन विमान कोसळण्याची शक्यता वाढते.

1/8

विमानात मोबाईल Flight Modeवर न ठेवल्यास काय होईल? जाणून घ्या

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

Flight Mode In Aeroplane: तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल किंवा एखाद्या चित्रपटातील दृश्यात तुम्ही फ्लाइट अटेंडंटला असे म्हणताना ऐकले असेल की, तुम्ही तुमचा सीट बेल्ट बांधा आणि फोन फ्लाइट मोडवर ठेवा. असे का म्हटले जाते याचा कधी विचार केला आहे का?

2/8

सिस्टम रीबूट

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

सध्या स्मार्टफोन वापरण्याचा ट्रेंड असून लोकांना त्याची अनेक वैशिष्ट्ये माहिती नसतात. फ्लाइट मोड हे त्यातील एक फिचर आहे. नेटवर्क खराब असताना बहुतेक लोक ते सिस्टम रीबूट म्हणून वापरतात. असे असाताना आरामदायी विमान प्रवासासाठी फ्लाइट मोडची रचना करण्यात आली आहे. 

3/8

फ्लाइट मोडचे काम

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

मोबाईल फोनमध्ये, फ्लाइट, एअरोप्लॅन, स्टँडअलोन मोडचा पर्याय दिलेला असतो. विमान प्रवासात पूर्वी फोन बंद करावा लागायचा. जेव्हा तुम्ही फ्लाइट मोड चालू करता, तेव्हा तुमचा फोन नेटवर्क क्षेत्राबाहेर जातो. यामुळे जीपीएस, ब्लूटूथ आणि वायफाय सारख्या अनेक सेवा बंद होतात. 

4/8

कॉल सेवा बंद

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

यासोबतच इंटरनेट आणि कॉलिंग सेवाही बंद होते. फोनला या मोडमध्ये ठेवल्यानंतर, तुम्ही कोणताही इनकमिंग कॉल घेऊ शकत नाही किंवा आउटगोइंग कॉल करू शकत नाही.

5/8

फोन वापरू शकता

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

एक प्रकारे तुमचा फोन बंद झालेला असतो. या मोडमध्ये ठेवण्याचा एक फायदा आहे की तो बंद असूनही तुम्ही तुमचा फोन वापरू शकता. फोनमध्ये तुम्ही चित्रपट, व्हिडिओ पाहू शकता, संगीत ऐकू शकता आणि गेम खेळू शकता.

6/8

फ्लाइटमध्ये हा मोड चालू करणे का आवश्यक?

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

उड्डाण दरम्यान, पायलट संपूर्ण वेळ नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात. हा संपर्क रेडिओ लहरींद्वारे राखला जातो, जो विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये उपयुक्त आहे. 

7/8

मोबाईल सिग्नल

SmartPhones Flight Mode On In Aeroplane know Reason

त्याचवेळ मोबाईल फोन देखील एकाच वेळी अनेक टॉवरशी सिग्नल जोडत राहतात. मोबाईल लहरी इतर ठिकाणच्या संपर्क यंत्रणेशी जोडण्यास सुरुवात करतात.

8/8

विमान कोसळण्याची शक्यता

SmartPhones Flight Mode on In Aeroplane know Reason

अशा स्थितीत मोबाईल बंद किंवा फ्लाइट मोडवर नसल्यास वैमानिक आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील संवादात समस्या निर्माण होतात आणि नियंत्रण कक्षाकडून येणारी माहिती वैमानिकाला स्पष्टपणे मिळत नाही. त्यामुळे विमान उड्डाण करताना अडचणी निर्माण होऊन विमान कोसळण्याची शक्यता वाढते.