Ind vs Eng: टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! 4 खेळाडू मोडू शकतात 'हे' रेकॉर्ड्स

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना आज मोटेरा स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Feb 24, 2021, 12:36 PM IST
1/4

7500 आकड्यापर्यंत पोहोचू शकतो कोहली

7500 आकड्यापर्यंत पोहोचू शकतो कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्यात 7500 धावा पूर्ण करण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहली करू शकतो. त्याला हा विक्रम करण्याची संधी मोटेरा स्टेडियमवर दोन सामन्यादरम्यान मिळणार आहे. विराट कोहलीनं कसोटी सामन्यात 7463 धावा केल्या आहेत. 7500 धावा करण्यासाठी केवळ 37 धावांची गरज आहे. या दोन सामन्यादरम्यान विराट कोहलीला ही संधी आहे. 

2/4

2500 धावांसाठी हिटमॅन केवळ 25 धावा दूर

2500 धावांसाठी हिटमॅन केवळ 25 धावा दूर

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज आणि हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या 25 धावा दूर आहे. रोहितच्या 45.83 च्या सरासरीने 2475 धावा आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पुढील सामन्यात रोहित आरामात या धावा करून विक्रम पूर्ण करू शकतो. रोहित शर्माकडून आता सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. 

3/4

धोनीला मागे टाकणार विराट कोहली?

धोनीला मागे टाकणार विराट कोहली?

विराट कोहली आणखीन एक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडू शकतो अशी चर्चा आहे. कसोटी सामने जिंकण्याच्या दृष्टीनं विराट कोहली महेंद्रसिंगला मागे टाकू शकतो. ही कसोटी मालिका कर्णधार विराट कोहली जिंकल्यास माहीचा विक्रम मोडला जाईल. घरच्या मैदानावर कोहली आणि धोनी यांनी 21 कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. धोनीने 30 सामन्यांत हे कामगिरी केली होती, तर विराटने 28 सामन्यांमध्ये हे कामगिरी केली होती. पुढील कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला तर कोहली धोनीच्या पुढे जाईल.   

4/4

अश्विन 400 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनू शकतो

अश्विन 400 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनू शकतो

भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 400 विकेट घेण्याची संधी आहे. अश्विनने 76 सामन्यांत 394 बळी घेतले आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर असून त्यांनी 80 सामन्यात ही कामगिरी केली होती.