कोरोना वॅक्सीनबाबत ट्विट करण्याताना सावधान ! अन्यथा तुमचं अकाऊंट कायमचं बंद

Mar 03, 2021, 21:14 PM IST
1/5

कोरोना वॅक्सीनवर कमेंट करताना सावधान

कोरोना वॅक्सीनवर कमेंट करताना सावधान

जर तुम्ही twitter वर एक्टिव आहात तर सतर्क राहण्याची गरज आहे. तुमची एक छोटीशी चुक तुमचं अकाउंट ब्लॉक करु शकते. Twitter ने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात निष्काळजीपणा चालणार नाही.

2/5

अफवा पसरवणाऱ्यांचं अकाउंट होणार बंद

अफवा पसरवणाऱ्यांचं अकाउंट होणार बंद

Twitter ने माहिती दिली आहे की कोणत्याही यूजरने कोरोना वॅक्सीन बद्दल कोणतीही अफवा पसरवली तर त्यांचं अकाउंट बंद केलं जाईल आणि तो युजर पुन्हा Twitter अकाउंट वापरु शकणार नाही.

3/5

Twitter चा निर्णय

Twitter चा निर्णय

मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप Twitter ने स्पष्ट केलं आहे की पहिल्यांदा वॅक्सीनबाबत कोणीही चुकीची माहिती दिली तर त्या युजरला आधी सुचना दिली जाईल पण दुसऱ्यांदा चूक केली तर 12 तासांसाठी त्याचं अकाऊंट लॉक केलं जाईल. वारंवार चूक करणाऱ्या व्यक्तीचं अकाऊंट कायमचं बंद केलं जाईल.

4/5

आतापर्यंत 8400 अकाउंट बंद

आतापर्यंत 8400 अकाउंट बंद

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोना वॅक्सीनबाबत अफवा पसवणऱ्या 8400 यूजरचे Twitter अकाउंट बंद केले गेले आहेत.  

5/5

सर्व भाषांवर नवीन नियम लागू

सर्व भाषांवर नवीन नियम लागू

Twitter ने सांगितले आहे की, नवीन नियम सर्व भाषांसाठी लागू असणार आहे. याची सुरुवात इंग्रजी भाषेत अफवाह पसरवणाऱ्यां युजर्सकडून करण्यात आलीये. यानंतर सर्व भाषांवर नियम लागू होणार आहेत.