Ind vs Eng: विजयासह मालिका जिंकण्यास भारत तयार 'या' खेळाडूंना प्लेइंग इलेवनमध्ये संधी?

भारत विरुद्ध इंग्लंड आज निर्णयाक लढत आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा पाचवा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. मालिकेत भारत-इंग्लंड दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणं भारतासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. या सामना खिशात घालण्यासाठी भारतीय संघात कोणकोण खेळाडू असू शकतात जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेवन टीम

Mar 20, 2021, 08:31 AM IST
1/11

ईशान किशन

ईशान किशन

ईशान किशननं अर्धशतक झळकावलं होतं. त्याला एका सामन्यासाठी आराम देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ईशान किशनवर मोठा जबाबदारी देण्यात येणार आहे. (फोटो-BCCI)

2/11

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवनं दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. मात्र त्याला फलंदाजीसाठी संधी देण्यात आली नाही. चौथ्या टी 20 सामन्यात त्याने आपली जबरदस्त कामगिरी दाखवली त्यामुळे आता पाचव्या सामन्यात पुन्हा त्याला संधी मिळू शकते. (फोटो-BCCI)

3/11

विराट कोहली (कप्तान)

विराट कोहली (कप्तान)

विराट कोहली पहिल्य सामन्यात शून्यवर आऊट झाला असला तरी उर्वरित सामने त्याची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. शेवटच्या सामन्यात संघाला बळ देऊन मालिका खिशात घालण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे. 

4/11

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या मीडल ऑर्डला मजबूती देण्याचं काम करू शकतो. त्यामुळे तो देखील प्लेइंग इलेवनमध्ये खेळताना दिसू शकतो.  

5/11

ऋषभ पंत (विकेटकीपर)

ऋषभ पंत (विकेटकीपर)

टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने कदाचित या मालिकेत कोणतेही अर्धशतक ठोकले नसले तरी इंग्लिश गोलंदाजांविरूद्ध त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो देखील यावेळी शेवटच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. (फोटो- बीसीसीआय)

6/11

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या (Hardik Pandya)च्या ऑलराउंडर  स्किलचा फायदा टीम इंडिया होऊ शकतो. त्यामुळे त्याला संघात संधी मिळू शकते. 

7/11

अक्षर पटेल

अक्षर पटेल

वॉशिंग्टन सुंदरऐवजी यावेळी मात्र अक्षर पटेलला संधी दिला जाण्याची शक्यता आहे. चौथ्या सामन्यात वॉशिंग्टनची कामगिरी विशेष चांगली नव्हती. (फोटो-BCCI)

8/11

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकूरने शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली आणि निसटता विजय खेचून आणला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला प्लेइंग इलेवनसाठी संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.  (फोटो-BCCI)

9/11

रोहित शर्मा

रोहित शर्मा

मागच्या दोन सामन्यात जरी रोहित शर्माची कामगिरी विशेष राहिली नसली तरी चौथ्या कसोटी सामन्यातील विजयामध्ये त्याला मोठा वाटा आहे. शेवटच्या 4 ओव्हर्सनी संपूर्ण खेळ बदलवून टाकला. रोहित शर्मा पुन्हा एकदा तुृफान फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे.

10/11

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

मोठ्या गॅपनंतर टी 20 अखेरच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा दिसू शकतो. इंग्लंडच्या फलंदाजांना तंबुत धाडण्याची जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे.  (फोटो-BCCI)

11/11

राहुल चाहर

राहुल चाहर

टी 20 सामन्यामध्ये इंग्लंड संघातील दोन महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या विकेट्स घेणाऱ्या राहुल चाहरला शेवटच्या सामन्यासाठी आज पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. (फोटो-BCCI)