कुंभमेळ्यानंतर नागा साधू कुठे जातात? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील ही 'रहस्य'

Naga Sadhu Life: भारतात नागा साधू केवळ कुंभमेळा आणि माघ मेळा यांसारख्या विशेष प्रसंगी दिसतात. नागा साधू बनण्यापासून ते त्यांचं जीवन आणि  राहणीमानही खूप रहस्यमय आहे. यामुळेच ऋषी-मुनींच्या या समुदायाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

| Dec 08, 2023, 15:52 PM IST
1/7

कुंभमेळा किंवा माघमेळा यासारख्या विशेष प्रसंगी दिसणारे नागा साधु मेळ्यानंतर अचानक गायब होतात. नागा साधू पवित्र नद्या किंवा तीर्थक्षेत्रे सोडून इतरत्र क्वचितच दिसतात.

2/7

इतर वेळी नागासाधू कुठे राहतात? काय खातात? आपला उदरनिर्वाह कसा करतात याबद्दल अनेकांना उत्सकुता आहे. नागा साधु यांचं जग खूपच रहस्यमय असतं. 

3/7

संपूर्ण शरीलाल भस्म फासलेले, मोठमोठ्या जटा असलेले ईश्वरभक्तीत तल्लीन राहणारे नागासाधु शक्यतो डोंगर, जंगलं, गुफा किंवा प्राचीन मंदिराता राहतात. ज्या ठिकााणी सामान्य लोकांची वर्दळ नसते अशा ठिकाणी ते एकांतात राहतात.

4/7

निर्वस्त्र राहत असल्यामुळे त्यांना नागासाधु असलं म्हटलं जातं. नागासाधु आपला बराचसावेळ तपस्येत घालवतात. कुंभमेळ्या व्यतिरिक्त ते सामान्य लोकांसमोर येत नाहीत. 

5/7

भिक्षा मागून किंवा जंगल-डोंगरदऱ्यात राहाणारे नागासाधु कंदमूळं खाऊन ते आपलं पोट भरतात. अनेक दिवस उपाशी राहण्याची त्यांची क्षमता असते. 

6/7

नागासाधु आपला सर्व प्रवास हे पायी आणि शक्यतो रात्रीच्या वेळी करतात. ते कोणत्याही आरामदायी वस्तूंचा वापर करत नाहीत. जमिनीवरच झोपतात. 

7/7

नागा साधूंचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या या धुनीजवळच व्यतीत होते. ते प्रवासात असताना धुनी सोबत नसते, परंतु एखाद्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर पहिले काम ते धुनी पेटवण्याचे करतात (Disclaimer: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.  झी 24 तास याची पुष्टी करत नाही)