MIG 21 Fighter आता लढाईच्या रणांगणात दिसणार नाहीत, भारतीय वायुसेनेचा मोठा निर्णय

MIG 21 Fighter Aircraft:  मिग 21 लढाऊ विमानाचे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) मोठा निर्णय घेतला आहे.  वायूसेनेकडून MIG-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. 

| May 20, 2023, 22:14 PM IST
1/6

वायूसेनेकडून MIG-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे भारतीय वायुसेनेने हा निर्णय घेतला आहे. 

2/6

गेल्या आठवड्यात राजस्थानमध्ये एका मिग 21 विमानाचा अपघात होऊन त्यात 3 जवान शहीद झाले होते. याआधीही अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

3/6

1963 साली भारतीय वायुसेनेत MIG 21 चा प्रवेश झाला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 400 लढाऊ मिग विमानं दुर्घटनाग्रस्त झाली आहे. 

4/6

भारतीय वायुसेनेते नुकतंच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्सने 48000  कोटी रुपयांचा करार केला आहे. यात 83 विमानं भारतीय सेनेचा हिस्सा बनलीत. 

5/6

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने मिग 21 लढाऊ विमानं बाद केली जातील. 

6/6

भारतीय वायुसेनेकडे आता केवळ 50 मिग विमानं आहेत. भविष्यात भारतीय वायुसेना 114 मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.