एक ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये का? Vande Bharat ची किंमत पाहून बसेल धक्का

Indian Railway Coaches Price: सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. तसेच सर्वात स्वस्त रेल्वे प्रवासासाठीही जगभरात भारतीय रेल्वे ओळखली जाते. मात्र प्रवाशांना स्वस्तात ज्या रेल्वेच्या डब्यांमधून प्रवास करता येतो ते डबे आणि ट्रेन बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो तुम्हाला ठाऊक आहे का?

Jun 21, 2023, 18:08 PM IST
1/15

Indian Railway coaches Making cost

ट्रेनचा एक डबा बनवण्यासाठी किती खर्च येतो माहितीये का? जनरल, एसी किंवा स्लीपर क्लासच्या डब्याची किंमत किती असते ठाऊक आहे का? एका इंजिनची किंमत किती असते याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? वंदे भारत ट्रेनची किंमत किती आहे याची कल्पनाही तुम्ही करु शकत नाही. जाणून घेऊयात याचबद्दल...

2/15

Indian Railway coaches Making cost

भारतामधील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. सर्वात स्वस्त पर्याय असल्याने भारतामधील बहुतांश सर्वसामान्य जनता लांबच्या प्रवासासाठीही ट्रेनचाच पर्याय निवडतात.

3/15

Indian Railway coaches Making cost

अगदी लोकल ट्रेनपासून ते एक्सप्रेस ट्रेनपर्यंत आणि मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या वंदेभारत ट्रेन्सपर्यंत अनेक ट्रेन भारतीय रेल्वे मार्गावर धावतात.

4/15

Indian Railway coaches Making cost

भारतात जवळजवळ 15 हजार ट्रेन धावतात. सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क असलेल्या जगातील टॉप 5 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. अगदी मेट्रो शहरांपासून ते गावांपर्यंत अनेक ठिकाणं ट्रेनने जोडली गेलेली आहेत. 

5/15

Indian Railway coaches Making cost

आज आपण भारतामध्ये ट्रेन बनवण्यासाठी निर्मितीचा खर्च किती येतो हे जाणून घेणार आहोत. सोबतच प्रत्येक डबा बनवण्यासाठी किती खर्च येतो हे ही पाहणार आहोत. 

6/15

Indian Railway coaches Making cost

भारतामध्ये धावणाऱ्या रेल्वे डब्यांमध्ये अनेक प्रकारचे डबे असतात. यामध्ये जनरल डबे, स्लीपर डबे, एसी डब्यांचा समावेश असतो. प्रत्येक डब्यातील सोयीसुविधा वेगवेगळ्या असतात. त्यामुळेच ते बनवण्यासाठी येणारा खर्चही वेगवेगळा असतो.

7/15

Indian Railway coaches Making cost

भारतीय रेल्वेमधील जनरल डबा बनवण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च येतो. जनरल डब्यामध्ये विशेष अशा कोणत्याच सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत.

8/15

Indian Railway coaches Making cost

एक स्पीपरचा डबा बनवण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा खर्च येतो. स्लीपर कोचमध्ये झोपण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिलेली असते.

9/15

Indian Railway coaches Making cost

भारतीय रेल्वेमधील एसी डबा तयार करण्यासाठी तब्बल 2 कोटींचा खर्च रेल्वेकडून केला जातो.

10/15

Indian Railway coaches Making cost

भारतात धावणाऱ्या रेल्वे इंजिन्सबद्दल बोलायचं झाल्यास एका रेल्वे इंजिनची सरासरी किंमत 18 ते 20 कोटी रुपयांदरम्यान असते.

11/15

Indian Railway coaches Making cost

म्हणजे सर्व हिशेब लावला तर एक 24 डब्यांची ट्रेन ही जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपयांची असते.

12/15

Indian Railway coaches Making cost

प्रत्येक ट्रेन बनवण्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. एमईएमयू प्रकारची 20 डब्यांची ट्रेन बनवण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च येतो. कालका मेल ही 25 डब्यांची आयसीएफ प्रकारातील ट्रेन बनवण्यासाठी 40 कोटींच्या आसपास खर्च येतो.

13/15

Indian Railway coaches Making cost

हावडा, राजधानी प्रकारात मोडणाऱ्या 21 डब्यांच्या एलएचबी टाइपच्या ट्रेन (इंजिनसहीत) बनवण्यासाठी अंदाजे 61 कोटींहून अधिक खर्च येतो. अमृतसर शताब्दी सारख्या 19 डब्यांच्या एलएचबी ट्रेन तयार करण्यासाठी 60 कोटींचा खर्च येतो. 

14/15

Indian Railway coaches Making cost

म्हणजेच एका सर्वसामान्य ट्रेनची किंमत 60 ते 70 कोटींदरम्यान असते. मात्र नव्याने सुरु झालेल्या 'वंदे भारत' ट्रेन्सची किंमत ऐकून तुम्हाला अजूनच धक्का बसेल.

15/15

Indian Railway coaches Making cost

भारतामध्ये सध्या 18 मार्गावर धावणारी एक 'वंदे भारत' ट्रेन बनवण्यासाठी तब्बल 110 ते 120 कोटी रुपयांचा खर्च येतो.