Indian Railway: गरीब आणि श्रमिकांसाठी विशेष ट्रेन, रेल्वेचा महत्वाचा निर्णय

भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. देशातील मोठी लोकसंख्या रेल्वेने प्रवास करत असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे नेहमी महत्वाचे निर्णय घेत असते. 

| Jul 22, 2023, 08:34 AM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. देशातील मोठी लोकसंख्या रेल्वेने प्रवास करत असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे नेहमी महत्वाचे निर्णय घेत असते. 
आता रेल्वेने श्रमिक आणि गरिबांना खूशखबर दिली आहे. 

1/7

Indian Railway: गरीब आणि श्रमिकांसाठी विशेष ट्रेन, रेल्वेचा महत्वाचा निर्णय

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

Indian Railways: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. देशातील मोठी लोकसंख्या रेल्वेने प्रवास करत असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे नेहमी महत्वाचे निर्णय घेत असते. आता रेल्वेने श्रमिक आणि गरिबांना खूशखबर दिली आहे. 

2/7

प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी ट्रेन

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

भारतीय रेल्वेने सर्वसामान्य लोकांसह काही विशिष्ट वर्गांना खूप चांगली बातमी दिली आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर तुम्हाला स्वस्तात प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी ट्रेन चालवते. आता रेल्वेने मजूर आणि गरिबांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3/7

गाड्यांना 22 ते 26 डबे असणार

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

रेल्वेने जनता एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात प्रवास करू शकणार आहात. या ट्रेन्स खास कामगारांसाठी चालवल्या जात आहेत. ज्या मार्गावर कामगारांची जास्त वर्दळ असते त्या मार्गांवर या गाड्यांचे संचालन अधिक असेल. या गाड्यांना 22 ते 26 डबे असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

4/7

2024 पर्यंत गाड्या सुरू होऊ शकतात

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांमध्ये फक्त स्लीपर आणि जनरल डबे असतील आणि 2024 पर्यंत या गाड्या सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या गाड्यांचे भाडे सामान्य गाड्यांपेक्षा कमी असेल, असे मानले जात आहे.

5/7

कन्फर्म तिकीट मिळवा

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने प्रवास करतात अशा ठिकाणच्या मार्गावर प्रामुख्याने या गाड्या चालविल्या जातील. जेणेकरून कामगारांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. यासोबतच या लोकांना कन्फर्म तिकीट सहज मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे वृत्तही माध्यमांनी दिले आहे. 

6/7

रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

सणासुदीत धावणाऱ्या गाड्यांपेक्षा या गाड्या वेगळ्या चालवल्या जातील आणि वर्षभर सुरू राहतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासोबतच, नुकतेच रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना स्वस्त दरात अन्न आणि पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

7/7

या गाड्या कोणत्या राज्यात धावतील?

Indian Railway Janta Express Special train for poor and labourers

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात आणि दिल्ली दरम्यान धावतील. बहुतेक कामगार, कारागीर, मजूर आणि इतर लोक या राज्यांमधून येतात आणि नंतर घरी जातात. त्यांना याचा फायदा होणार आहे.