Indian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई
बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत.
Indian Railway : (Asia) आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं म्हणूनही जगभरात भारतीय रेल्वेची ओळख आहे. विविध भौगोलिक रचना असणाऱ्या प्रदेशांना, प्रांताना आणि अगदी देशांना जोडणारी ही भारतीय रेल्वे अनेकांसाठीच आवडीचा विषय.