Indian Railway: ट्रेनमधून चादर, उशी चोराल तर चांगलेच फसाल, जाणून किती आहे शिक्षा

Train Coach: देशात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. गावाला किंवा परराज्यात जाण्यासाठीही लोकं ट्रेनला पहिलं प्राधान्य देतात. लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनातर्फे चादर आणि उशी प्रवाशांना दिली जाते. पण ही चादर आणि उशी प्रवासी घरी घेऊन जाऊ शकतात का?

| Sep 22, 2023, 20:17 PM IST
1/7

गावाला जायचं असो की परराज्यात, प्रवासासाठी प्रवाशांची पहिली पसंती असते ती ट्रेनला. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असून लाखो प्रवासी दररोज ट्रेनने प्रवास करतात

2/7

प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी प्रयत्नशील असतं. यापैकीच एक सुविधा म्हणजे लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवशांना चादर आणि उशी दिली जाते. 

3/7

प्रवाशांना ट्रेनमध्ये आरामदायी प्रवास करता यावा यासाठी स्लीपर कोचमध्ये चादर आणि उशी दिली जाते. पण ही चादर आणि उशी कुणी चोरण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिक्षेची तरतुद आहे. 

4/7

चादर, उशी चोरुन घरी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक दंड आणि तुरुंगवास अशा दोनही शिक्षा होऊ शकतात. 

5/7

रेल्वे प्रॉपर्टी अॅक्टनुसार (Railway Property Act, 1966) पहिल्यांदा पकडला गेल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोनही शिक्षा होऊ शकतात. 

6/7

रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी रेल्वेसंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या जातात. रेल्वेतलं कोणतंही सामान चोरणं हे कायद्याने गुन्हा ठरतं.

7/7

रेल्वे प्रशासनाने दिलेल्य माहितीनुसार चादर, उशीबरोबरच चमचे, बाऊल, नळही चोरील जातात. यामुळे रेल्वेला मोठं नुकसान सहन करावं लागतं.