देशातील रेल्वे स्टेशन होणार जागतिक दर्जाची, महाराष्ट्रातील 'इतक्या' स्थानकांचा समावेश

Aug 05, 2023, 15:17 PM IST
1/7

देशातील रेल्वे जागतिक दर्जाची होणार, महाराष्ट्रातील 'इतक्या' स्थानकांचा समावेश

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

Indian Railway: भारतीय रेल्वे जागतिक दर्जाची बनविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भारतातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सोहळा होणार आहे.

2/7

अमृत भारत स्टेशन योजना

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणार आहे. या संपूर्ण कामासाठी 24,470 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोदी सरकारच्या पुनर्विकासाच्या कामानंतर रेल्वे स्थानकाचे जागतिक दर्जाच्या स्थानकात रुपांतर होणार आहे. भारत सरकारकडून या स्थानकांचे फोटो शेअर केले आहेत.

3/7

जागतिक दर्जाची रेल्वे

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

मोदी सरकार अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 508  रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणार आहे. या योजनेअंतर्गत भारतातील 1,309 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

4/7

24,470 कोटी रुपये खर्च

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

मोदी सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास कामाचा एकूण खर्च 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. 

5/7

रेल्वे स्थानके स्मार्ट

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

सरकारच्या या पावलामुळे रेल्वे स्थानके स्मार्ट होणार आहेत. रेल्वे स्थानकांना सिटी सेंटर म्हणून विकसित करण्याची मोदी सरकारची योजना आहे. त्यामुळे मोदी सरकारनेही संपूर्ण मास्टर प्लॅन तयार केला आहे. योजनेंतर्गत रेल्वे स्थानक हे शहरातील विकासाचे माध्यम व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे.

6/7

महाराष्ट्रातील 44 स्थानके

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 508 स्थानकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील 44 स्थानकेदेखील आहेत.

7/7

रेल्वे स्थानके शहराची केंद्रे

Indian railway stations change world class under amrut bharat station scheme

पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रेल्वे स्थानकांची रचना ही परदेशातील हायफाय रेल्वे स्थानकांसारखी असेल. एवढेच नाही तर स्थानिक संस्कृती आणि वास्तुकला यांनाही त्यांच्या रचनेत स्थान दिले जाणार आहे. या रेल्वे स्थानकांचा शहर केंद्रे म्हणून पुनर्विकास केला जाईल.