एका रेल्वे तिकिटावर करा 56 दिवस प्रवास, कसं करायचं बुकींग? समजून घ्या
Circular Journey Ticket:रेल्वेकडून सर्कुलर जर्नी तिकीट नावाचे विशेष तिकीट जारी केले जाते. या तिकिटाद्वारे रेल्वे प्रवासी 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून एका तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकतात.
Indian Railway : दूरवरचा प्रवास कमी पैशात करण्यासाठी लाखो प्रवासी भारतीय रेल्वेची सेवा वापरतात. अनेकजण आधीच बुकींग करुन ठेवतात तर काहीजण काऊंटर तिकिट काढून प्रवास करतात. दरम्यान रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात पण अनेकदा प्रवाशांना याबद्दल माहिती नसते.