एलन मस्क यांच्या Twitter मुळे ट्रेनच्या मागे लिहिलेला X चर्चेत; जाणून घ्या Interesting कारण

काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत Indian Railways च्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन धावतात. या एक्सप्रेस ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर  X हे अक्षर लिहीलेले असते. 

Jul 25, 2023, 18:21 PM IST

Indian Railways :  एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा (Twitter) लोगो बदलला आहे. ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे.  यामुळे सध्या X हे अक्षर चांगलेच ट्रेंडिग मध्ये आहे. यामुळे Indian Railways ट्रेनच्या मागे असलेला X देखील चर्चेत आला आहे. भारतीय रेल्वेच्या एक्सप्रेस ट्रेनच्या मागे X हे अक्षर लिहीलेले असते.  जाणून घ्या यामगाचे Interesting कारण.

1/7

Indian Railways च्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन या 12 ते 15 डब्यांच्या असतात. या एक्सप्रेस ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर मोठ्या आकारात X हे अक्षर लिहीलेले असते. 

2/7

शेवटच्या डब्यावर X चिन्ह मोठ्या आकारान लिहीलेले असते जेणकरुन रेल्वे कर्मचाऱ्यांना दूरनही हा रेल्वेचा शेवटचा डबा असल्याचे ओळखता यावे. 

3/7

शेवटच्या डब्यावर X चिन्ह नसेल तर रेल्वे स्टाफ अलर्ट होतो. ट्रेनचे मागील डब्बे वेगळे झाले आहे, अशी माहिती त्यांना मिळते.   

4/7

सुरक्षिततेसाठी ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर X चिन्ह काढले जाते. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कळतं की हा शेवटचा डब्बा आहे. 

5/7

हे चिन्ह पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात असते. या चिन्हाचा अर्थ आहे हा ट्रेनचा शेवटचा डबा आहे. 

6/7

हे इंग्रजीतील एक्स अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे.   

7/7

एक्सप्रेस ट्रेनच्या डब्ब्यांवर अनेक चिन्ह लिहिलेली असतात.  या चिन्हांना विशेष अर्थ असतो असाच  X अक्षराचा देखील अर्थ आहे.