पृथ्वीवरुन लुप्त होणाऱ्या गिधाडांचे माणसांच्या मृत्यूशी कनेक्शन. पक्षाचं अस्तित्व नसणं बनतंय 5 लाख मृत्यूंचं कारण

| Jul 27, 2024, 15:48 PM IST
1/8

पृथ्वीवरुन लुप्त होणाऱ्या गिधाडांचे माणसांच्या मृत्यूशी कनेक्शन. पक्षाचं अस्तित्व नसणं बनतंय 5 लाख मृत्यूंचं कारण

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

गेल्या काही वर्षात भारतातील गिधाडांची संख्या वेगाने कमी होत आहेत. भारतातील गिधाडे जवळजवळ नष्टच झाल्यात जमा आहे. एकवेळ अशी होती जेव्हा भारतात गिधाड सर्वत्र आढळायचे. गिधाड कचऱ्यातील ढिगाऱ्यातून मेलेले प्राणी, मांस शोधून खातात. 

2/8

डायक्लोफिनाकमुळे भारतात गिधाड मरु लागली

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

साधारण 3 दशकांपुर्वी आजारी गाईंच्या उपचारासाठी देण्यात आलेल्या डायक्लोफिनाकमुळे भारतात गिधाड मरु लागली. 1990 दशकाच्या मध्यापर्यंत 5 कोटी गिधाडांची संख्या आता नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. यामुळे माणसाने नवे आजार आणि मृत्यूला ओढवून घेतलंय असं म्हटलं जात. पण का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/8

पक्षांच्या किडनी फेल

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

गिधाडांच्या मृत्यचे कारण ठरलेल्या औषधाची स्वस्त गैर स्टेरायडल ही वेदना निवारक म्हणून काम करते. हे औषध ज्या पशुंना देण्यात आले, त्यांचे शव खाल्याने पक्षांच्या किडनी फेल झाल्या आणि ते मृत्यूमुखी पडले. 

4/8

गिधाडांच्या 3 प्रजाती कमी

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

डाइक्लफिनाकच्या पशु चिकत्सेसाठीच्या उपयोगावर 2006 मध्ये प्रतिबंध लावण्यात आला.पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. या औषधामुळे गिधाडांच्या 3 प्रजाती 91 ते 98 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या होत्या. गिधाडांचं नष्ट होणं माणसासाठी धोकादायक आणि मृत्यूचं कारण ठरतंय. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

5/8

गिधाड नसल्यास 5 लाख लोकांचा मृत्यू

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

अमेरिकन इकोनॉमिक असोशिएशन जर्नलमध्ये एक संशोधन छापण्यात आलंय. गिधाड नष्ट झाल्यावर घातक बॅक्टेरिया आणि संक्रमण रोग वाढणार आहेत. हे 5 वर्षात 5 लाख लोकांच्या मृत्यूचे कारण ठरु शकते.

6/8

पर्यावरणातून बॅक्टेरीया आणि रोगजनक मृत जनावरे नष्ट

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

गिधाडांना प्रकृती स्वच्छ करणारा पक्षी म्हटलं जातं. यांच्यामुळे पर्यावरणातून बॅक्टेरीया आणि रोगजनक मृत जनावरे नष्ट होतात. गिधाड नसतील तर बॅक्टेरीयाचे प्रमाण वाढेल, असे रिसर्चचे सहलेखक प्राध्यापक इयाल फ्रॅंक यांनी म्हटलंय.

7/8

मानवी मृत्यूदर 4 टक्क्यांनी वाढला

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

भारतातील ज्या जिल्ह्यामधून गिधाडांची संख्या कमी झालीय, तेथील मानवी मृत्यू दरांची तुलना फ्रॅंक यांनी केली आहे. गिधाडांच्या मृत्यूआधी आणि मृत्यूनंतर बॅक्टेरीयामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी बदलली आहे. सूजविरोधी (अॅण्टी इंफ्लामेंट्री) औषधांची विक्री वाढल्याने आणि गिधाडांची संख्या कमी झाल्याने त्या जिल्ह्यातील मानवी मृत्यूदर 4 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी पशुंची संख्या जास्त आणि आणि त्यांचे शव उघड्यावर फेकून दिले जाते अशा शहरी भागात याचा प्रभाव सर्वात जास्त जाणवला. 

8/8

भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली

Indian vultures disappearing from the earth Relation with human death

2000 आणि 2005 दरम्यान गिधाडांच्या कमीमुळे प्रत्येकवर्षी 1 लाखाहून अधिक मानवांचा मृत्यू झाल्याचे संशोधनात म्हटलंय. हे मृत्यू आजार आणि बॅक्टेरीया पसरल्याने झाले आहेत. गिधाडांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली आहे. ज्यामुळे मनुष्यांमध्ये रेबिज पसरलाय, असा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला.