IPL 2023 : एमएस धोणीच्या CSK वर बंदीची मागणी, तामिळनाडू विधानसभेत जोरदार हंगामा

CSK Controversy : आयपीएलचा सोळावा (IPL 2023) हंगाम सुरु आहे. एम एस धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंगने (Chennai Super Kings) पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे सलग दोन सामने जिंकलेत. पॉईंटटेबलमध्ये (IPL PointTable) चेन्नई सुपर पाचव्या स्थानावर आहे. पण दुसरीकडे तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) चेन्नई सुपर किंग्सवरुन जोरदार हंगामा सुरु आहे. तामिळनाडू विधानसभेत (Tamilnadu Assembly) सीएकसेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. धर्मपुरीतले पाट्टाली मक्कल कोची पार्टीचे आमदार वेंकटेश्वरन यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

Apr 11, 2023, 21:55 PM IST
1/6

पीएमकेचे आमदार वेंकटेश्वरन यांनी तामिळनाडू विधानसभेत चेन्नई सुपर किंग्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स हा संघ तामिळनाडू राज्याशी संबंधीत आहे. पण या संघात स्थानिक खेळाडूंनी महत्त्व देण्यात आलेलं नाही, तसंच संघात एकही तामिळ खेळाडू नाही, असं आमदार वेंकटेश्वरन यांनी म्हटलं. 

2/6

चेन्नई सुपर किंग हा तामिळनाडूतल्या एका शहाराशी निगडीत संघ आहे. या नावावर ते पैसे कमवत आहेत. पण संघात राज्यातील एकाही खेळाडूचा संबंध नाही यावर वेंकटेश्वरन यांनी लक्ष वेधलं. 

3/6

चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. संघाचं नाव चेन्नई आहे पण संघात एकाही स्थानिक खेळाडू नसणं हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री कारवाई करताील असा विश्वास असल्याचं वेंकटेश्वरन यांनी म्हटलंय. 

4/6

याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्याच्या तिकिटावरुनही वाद सुरु आहे. AIADMK च्या आमदाराने आयपीएलची तिकिटं मागितली होती, ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राज्यात AIADMKचं सरकार असताना त्यांना सामन्याचे पास देण्यात आले होते. पण आताच्या सरकारने AIADMKच्या आमदारांना एकही पास दिलेला नाही.

5/6

AIADMK आमदारांनी क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडे पासबाबत विचारणा केली होती. यावर स्टॅलिन यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांच्याकडून सामन्याचे पास घ्या असं उत्तर दिलं. गेल्या चार वर्षात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आयपीएलचे सामने खेळवण्यात आले नव्हते. 

6/6

AIADMK चे आमदार वेलूमणी यांनी क्रीडामंत्री स्टॅलिन यांना जय शाह यांच्याशी पासबाबत चर्चा करण्याची विनंती केली आहे. राज्यीतल सर्व आमदारांना सामन्याचे पास देण्यात यावेत अशी मागणी वेलूमणी यांनी केली आहे.