IPL 2023: 'या' सात खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपली? आपीएलचा हा अखेरचा हंगाम

Indian Premier League 2023: टी20 (T20) क्रिकेट हा झटपट क्रिकेटचा फॉर्मेट आहे. यात चपळाई आणि आक्रमकपणा महत्त्वाचा आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये जास्त संधी दिली. आता आयपीएलमध्येही (IPL 2023) युवा खेळाडू छाप उमटवत आहेत. दुसरीकडे यंदाच्या आयपीएलमध्ये काही वयस्क खेळाडू खेळतायत. पण अद्याप त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे काही खेळाडूंसाठी आयपीएलचा हा हंगाम अखेरचा ठरू शकतो. 

| May 11, 2023, 17:29 PM IST
1/7

सुनील नरेन

वेस्ट इंडिजचा जादूई फिरकीपटू सुनील नरेन आयपीएलमध्ये मोठ्या काळापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतोय. पण या हंगामात त्याच्या फिरकीची जादू कमी झाली आहे. आतापर्यंत त्याला केवळ 7 विकेटघेता आल्या आहेत. त्यामुळे 35 वर्षीय नरेनला पुढच्या वर्षात केकेआर रिलीज करण्याची शक्यता आहे. 

2/7

दिनेश कार्तिक

टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर म्हणून दिनेश कार्तिककडे पाहिलं जातं. पण या हंगामात दिनेश कार्तिक सपशेल अपयशी ठरला आहे. आरसीबीकडून खेळणाऱ्या 38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने 11 सामन्यात केवळ 40 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा हंगाम दिनेश कार्तिकसाठी अखेरचा असेल असं बोललं जातंय. 

3/7

केदार जाधव

मराठमोळ्या केदार जाधववर या हंगामात कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये कॉमेंट्रीच पर्याय निवडला. पण आयपीएलच्या मध्यावरच त्याचं नशीब चमकलं. रॉयल चॅलेंजर्सचा खेळाडू डेव्हिड विली आयपीएलमधून बाहेर पडला आणि आरसीबीने केदार जाधवला संघात बोलावलं. पण या हंगामापुरताच तो संघात आहे. 

4/7

पीयुष चावला

मुंबई इंडियन्सचा स्टार फिरकीपटू पीयुष चावलाने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. 35 वर्षांच्या पीयूष चावलाने 11 सामन्यात तब्बल 17 विकेट घेतल्या आहेत. 22 धावात 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण त्याचं वय पाहाता मुंबई पुढच्या हंगामात त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.

5/7

अमित मिश्रा

भारताचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतो. अमित मिश्राला सहा सामन्यात केवळ सहा विकेट घेता आल्या आहेत. 21 धावांवर 2 विकेट ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. 41 वर्षीय अमित मिश्राचं वाढतं वय पाहता पुढच्या आयपीएलमध्ये तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. 

6/7

अंबाती रायडू

एकेकाळी टीम इंडियाचा स्टार फलंदाज असलेला अंबाती रायडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतोय. 38 वर्षीय रायडूला 12 सामन्यात केवळ 118 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे पुढच्या हंगामात चेन्नई संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे. यानंतर अंबाती रायडू क्रिकेटला अलविदा करु शकतो.

7/7

मनीष पांडे

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मनीष पांडे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. पण 33 वर्षांच्या मनीषला आतापर्यंत दमदार कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात मनीष पांडेला केवळ 160 धावा करता आल्या आहेत. वाढतं वय आणि खराब फॉर्म बघता यंदाची आयपीएल स्पर्धा मनीष पांडेसाठी शेवटची ठरू शकते.