Filmfare Awards मध्ये Janhvi Kapoor सोबत गुलीगत धोका, दोनदा झाली Oops Moment ची शिकार अन्...

Janhvi Kapoor Photos:  अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (Star Kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Apr 29, 2023, 17:16 PM IST

Janhvi Kapoor Suffers Oops Moment: बॉलिवूडचा चुलबुली अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिला ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. तिच्या पोस्टची अनेकजण वाट पाहत असतात. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती दाखवली होती. त्यावेळी तिच्यासोबत नको ते घडलं...

1/7

नुकतंच जान्हवी कपूरने फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) सोहळ्यात उपस्थिती दाखवली होती. त्यावेळी तिच्यासोबत एकदा नव्हे तर दोन वेळा एकच घटना घडली.

2/7

जान्हवी कपूरला तिच्या स्टेज अॅक्टच्या काही मिनिटांपूर्वी तिच्या गाऊनची झिप (zip of gown) फाडली गेल्याने तिला त्रास झाला. एकदा नव्हे तर दोनदा. 

3/7

जान्हवी कपूरने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाली जान्हवी कपूर?

4/7

जान्हवीने तिच्या @janhvikapoor या इन्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली. त्यावेळी तिने Filmfare Awards मधील काही फोटो शेअर केले. त्यावर तिने एक मथळा लिहिला होता.

5/7

जेव्हा रेड कारपेटवर जाण्याआधी 5 मिनिटे आधी आणि स्टेज परफॉर्मन्सपासून 12 मिनिटे आधी तुमची जिप खराब झाली, असं कॅप्शन जान्हवीने दिलंय.

6/7

जान्हवी कपूरचा रेड कार्पेट लुकसाठी पर्पल रंगाचा गाऊन घातला होता. त्यामुळे तिचं सौदर्य आणखीच झळकत होतं. डीप स्वीटहार्ट नेकलाइन तिच्या लुकमुळे आणखी चकाकत होता.

7/7

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जान्हवी हिरवा ड्रेस घालून एका कार्यक्रमात पोहोचली होती. त्यावेळी तिच्यावर टीका केली जात होती.