Jioचा जबरदस्त प्लॅन; एकाच रिचार्जमध्ये वापरा 4 फोन, Amazon-Netflix ही पाहा मोफत

Jio Recharge Plan : जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅन मिळतात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काही खास रिचार्ज प्लॅन आहेत. 

Dec 31, 2022, 12:42 PM IST
1/7

jio user

Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काही खास प्लॅन आणत असते. ग्राहकांना कायमच आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी जिओने अगदी कमी दरात भरपूर लाभ देणारे रिचार्ज प्लॅन देखील आणले आहेत. अशाच एका रिचार्जद्वारे तुम्हाला चार फोन वापरता येणार आहेत.

2/7

jio family plan

जर तुमच्या कुटुंबात जिओचे सीमकार्ड वापणारे चार लोक असतील तर कंपनीचा हा खास प्लॅन तुमच्यासाठी आहे. या प्लॅनने तुम्ही सर्व चारही युजर्ससाठी फक्त एकच रिचार्ज खरेदी करू शकता.

3/7

jio

या फॅमिली प्लॅनद्वारे तुम्ही चार फोन एकाच वेळी वापरू शकता. या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएससह OTT फायदे देखील मिळणार आहेत

4/7

jio 5g

जिओच्या पोस्टपेड पोर्टफोलिओद्वारे तुम्हाला हा प्लॅन मिळवला येणार आहे. यासाठी युजर्सना बिलिंग सायकलमध्ये  999 रुपये खर्च करावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 200 GB डेटा मिळतो. चार लोकांसाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे.

5/7

jio plan

जर तुमचा डेटा संपला तर काळजी करण्याची गरज नाही. 10 रुपयांत तुम्हाला 1 GB डेटादेखील मिळू शकतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते. त्यामुळे तुम्ही पुढील महिन्यात देखील तुमचा उरलेला डेटा वापरु शकता.  

6/7

jio recharge

यासोबत हा रिचार्ज प्लॅन घेणारे Jioच्या 5G सेवेसाठीही पात्र असणार आहेत. तसेच ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या सुविधाही मिळणार आहेत.

7/7

Amazon Netflix

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स (मोबाइल प्लॅन) चे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय Amazon Prime चेही वर्षभराचे सबस्क्रिप्शन मिळते.