New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे. 

Dec 31, 2022, 12:24 PM IST

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover : सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे. 

 

1/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

नव्या वर्षाची सुरुवात हँगओव्हरनं (home remedies to cure hangover ) न करता तो कोणत्या घरगुती उपायांनी दूर कराल ते एकदा पाहा.   

2/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

टोमॅटो ज्यूस (tomato juice)- टोमॅटोच्या रसामध्ये ग्लुकोज आणि साखरेतील असे काही घटक असतात ज्यामुळं अल्कोहोल पचायला मदत होते. त्यामुळं रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं. हँगओव्हर झालाय टोमॅटोचा ज्यूस घ्या. 

3/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

आलं (ginger) - मद्यसेवनानंतर पोटामध्ये होणारी जलजळ दूर करण्यासाठी आणि हँगओव्हर घालवण्यासाठी आलंही फार मदत करतं. यामुळं मळमळही होत नाही. कच्च आलं किंवा आल्याचा रस तुम्ही हँगओव्हर घालवण्यासाठी खाऊ शकता. 

4/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

कच्चं सफरचंद किंवा केळी (apple and banana)- फ्रुट सलाड किंवा कच्ची फळं हँगओव्हर मोठ्या प्रमाणात कमी करतात. त्यातही काहीसं कच्चं सफरचंद आणि केळं मोठ्या फायद्याचं. रिकाम्या पोटी होणारी डोकेदुखी यामुळं कमी होते. 

5/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

पोटभर नाश्ता (breakfast)- रात्रभर केलेल्या पार्टीनंतर सकाळी डोकं भणभणल्यास आधी पोटभर नाश्ता करा. यामुळं मद्यसेवनादरम्यान तुमच्या शरीरातील गमावलेली पोषक तत्व परत मिळवण्यास मदत होते. 

6/6

New Year 2023 celebration 5 home remedies to cure hangover after party

भरपूर पाणी प्या (water)- अल्कोहोल किंवा मद्यसोवनानं तुमच्या शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळं सकाळी उठून तुम्हाला तहानल्यासारखं जाणवू शकतं. घाबरु नका, भरपूर पाणी प्या, शांत बसा. बरं वाटेल.