Kisan Sabha Morcha : शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील क्षणचित्रे पाहा

Kisan Sabha Morcha : शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. तर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha) 

| Mar 15, 2023, 09:56 AM IST

Kisan Sabha Morcha : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील क्षणचित्रे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे काय हाल सुरु आहेत, याचा अंदाज येत आहे. आपल्या मागण्यांवर शेतकरी ठाम आहे. पाठिवरच घर घेऊन मुंबईच्या दिशेने चालत आहेत.  नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.  यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.  शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha) 

1/11

Kisan Sabha Morcha : शेतकरी अडचणीत आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.  नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील क्षणचित्रे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे काय हाल सुरु आहेत, याचा अंदाज येत आहे. लाल वादळ मुंबईत धडकणार आहे! पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा कॅमेरात चित्रित झाल्यात. ( Kisan Morcha)     (सर्व छाया - सागर आव्हाड)

2/11

Kisan Sabha Morcha : आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी इकडे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी अन्यथा मुंबई बंद करु, असे आमदार विनोद निकोले म्हणाले आहेत.  शेतकऱ्याचा मोर्चा हा घाटणदेवी या ठिकाणी थांबलेला आहे. आता मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोर्च्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना भेटायला यावे, मोर्चा मुंबईत जाण्यापेक्षा त्यांनी इकडे यावे, अशी मागणी आमदार निकोले यांनी केली आहे.  (सर्व छाया - सागर आव्हाड)

3/11

Kisan Sabha Morcha : आपल्या मागण्यांसाठी संसाराचा गाडा हाकण्यासाठी अशी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

4/11

Kisan Sabha Morcha : किसान सभेतील मोर्चेकरी शेतकऱ्यांनी असा आसरा घेतला. 

5/11

Kisan Sabha Morcha : शेतकऱ्याचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

6/11

Kisan Sabha Morcha : शेतकरी राजाचे प्रश्न सुटत नसल्याने मुंबईच्या दिशेने धडक देणाऱ्या मोर्चात शेतकरी महिलाही मागे नाहीत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाच्यावेळी चुलीवर जेवण करताना महिला.

7/11

Kisan Sabha Morcha : शेतकऱ्याचा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांनी अशी चूल मांडली. चटणी-भाकरी खाऊन शेतकरी मार्गस्थ होत आहेत.

8/11

Kisan Sabha Morcha : शेतकऱ्याचा मोर्चा हा घाटणदेवी या ठिकाणी थांबलेला होता. यावेळी वाटेत काही खायला मिळेल की नाही माहित नसल्याने चुलीवर महिला जेवण करताना.

9/11

Kisan Sabha Morcha : शेतकऱ्यांनी आपला संसार असा रस्त्यावर थाटला. पोटासाठी दोन घास मिळावे म्हणून शेतकरी महिला अशी मेहनत घेत आहेत.

10/11

 Kisan Sabha Morcha : शेतकऱ्याचा मोर्चा हा घाटणदेवी या ठिकाणी थांबलेला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील क्षणचित्रे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे काय हाल सुरु आहेत, याचा अंदाज येत आहे.

11/11

Kisan Sabha Morcha : मुंबईच्या दिशेने निघालेले शेतकरी मिळेल तो विश्रांतीसाठी आसरा घेत आहे.  (सर्व छाया - सागर आव्हाड)