किशोरदांनी केली 4 लग्न; मधुबाला ते गीता बाली 'या' अभिनेत्रींसोबत लग्न करुनही खऱ्या प्रेमापासून राहिले वंचित

Kishore Kumar Birth Anniversary : सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. किशोरदांची गाणी ही आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. प्रोफेशनल लाइफसोबत त्यांची लव्ह लाइफ कायम चर्चेत राहायची. त्यांनी एक नाही तब्बल चार लग्न केली होती. पण तरीही शेवटी ते खऱ्या प्रेमापासून वंचित राहिले. 

| Aug 04, 2024, 16:41 PM IST
1/7

किशोर कुमार हे त्यांच्या काळातील सदाबहार अभिनेते अशोक कुमार यांचे भाऊ होते. अशोक कुमार यांना वाटायचं किशोर यांनीही अभिनेता बनावं. पण त्यांनी गायक म्हणून करिअरला सुरूवात केली. 

2/7

बॉम्बे टॉकीजमध्ये किशोरदा यांनी पहिल्यांदा गाणं गायले. त्यानंतर 1946 मध्ये त्यांनी 'शिकारी' चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं. किशोरदा गाण्याआधी अ‍ॅडव्हान्स घ्यायचे. पण त्यांनी राजेश खन्ना आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्यासाठी त्यांनी हा नियम मोडला होता. 

3/7

 किशोर कुमार यांनी बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी 131 गाणी गायली, त्यापैकी 115 गाणी सुपरहिट झाली. पण त्यानंतर 1980 मध्ये अमिताभ आणि किशोर यांची जोडी तुटली. खरं तर, किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ममता की छाव या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्यास सांगितलं होतं. पण अमिताभ यांनी नकार दिला होता. या नकाराने किशोर कुमार इतके संतापले की त्यांनी बिग बींसाठी पुन्हा गाणे गायले नाही.

4/7

अभिनय आणि गायनासोबतच किशोर कुमार यांचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. त्यांनी तब्बल चार लग्न केली होती. किशोर कुमारांच पहिलं लग्न हे बंगाली गायक आणि अभिनेत्री रुमा घोष यांच्याशी 1950 ला झाली. पण लग्नानंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि त्यांनी 1958 मध्ये घटस्फोट घेतला. 

5/7

रुमा घोष यांच्याशी लग्न तुटल्यानंतर किशोर कुमार यांनी मधुबालासोबत दुसरं लग्न केलं. पण 1969 ला मधुबाला यांचं निधन झालं. 

6/7

मधुबालांच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केलं. योगिता बाली आणि किशोर कुमार यांनी 1976 ला लग्न केलं खरं पण दोन वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. 

7/7

मग किशोर कुमार यांनी चौथं लग्न अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी 1980 लग्न केलं. त्यांचं लग्न सात वर्ष टिकलं. त्यानंतर 1987 किशोर कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.