किशोरदांनी केली इतकी लग्न, पण खऱ्या प्रेमापासून वंचित

Kishore Kumar Birth Anniversary : खऱ्या प्रेमाच्या शोधात किशोरदांनी चार वेळा लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला किशोर कुमारांच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात... 

Aug 04, 2022, 14:42 PM IST

Kishore Kumar Birth Anniversary : सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. किशोर कुमारांची गाणी ही आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. किशोर कुमार हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत राहीले होते. खऱ्या प्रेमाच्या शोधात किशोरदांनी चार वेळा लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला किशोर कुमारांच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात... 

1/4

रूमा घोष (Ruma Ghosh)

किशोर कुमारांच पहिलं लग्न हे बंगाली गायक आणि अभिनेत्री रुमा घोष यांच्याशी 1950 ला झाली. त्यांचा संसार फारकाल टिकला नाही. ते 1958 ला वेगळे देखील झाले.

2/4

मधुबाला (Madhubala)

रुमा घोष यांच्या नंतर किशोर कुमार यांनी मधुबाला यांच्याशी लग्न केलं. यांचं अफेअरच्या त्यावेळी खुप चर्चेत आलं. मधुबाला आणि किशोर कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे. या दोघांनी 1960 ला लग्न केलं आणि 1969 ला मधुबाला यांचा मृत्यू झाला.

3/4

योगिता बाली (Yogeeta Bali)

मधुबालांच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केलं. हे किशोर कुमारांच तिसरं लग्न होतं. योगिता बाली आणि किशोर कुमार यांनी 1976 ला लग्न केलं. दोन वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर यादोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

4/4

लीना चंदावरकर (Leena Chandavarkar)

किशोर कुमारांनी लीना चंदावरकर यांच्याशी 1980 ला लग्न केलं. किशोर कुमारांच हे चौथं लग्न होतं.